इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असून पोलीस देखील या गुन्हेगारांच्या सातत्याने शोध घेत असतात, मुंबई शहरातील गोवंडी पोलिसांना दुहेरी हत्येचा म्हणजे एका तरुण दाम्पत्याचा खून झाल्याचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे नाराज झालेल्या वडिलांनीच आपल्या मुलीची आणि जावयाची हत्या केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात मुलीचे वडील, भाऊ व भावाच्या मित्राला अटक करण्यात आली असून तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
जावयाचा गळा चिरला, मुलीचा गळा आवळून केला खून
अत्यंत भयानक गोष्ट म्हणजे मुलीने दुसऱ्या धर्मातील प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी मुलीची व जावयाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना देवनार परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मुलीने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन हिंदू मुलाशी लग्न केले होते. याचा राग येऊन मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांची हत्या करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. पोलिसांना प्रथम मुलाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा उलगडा झाला असता आरोपींच्या चौकशीत दुसरा मृतदेहही सापडला. अशा प्रकारे पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे.
या प्रकरणात करण चंद्र ( वय २२) व गुलनाज खान ( वय २०) यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाला प्रेमविवाह झाला होता. मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले असून त्यातही आणखी आंतरधर्मीय विवाह असल्याने मुलीच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी म्हणजे गोरा खान यांनी आणि मुलीच्या भावाने त्या दोघांचीही हत्या केली होती. यात आणखी भयानक प्रकार म्हणजे जावयाचा गळा चिरला होता तर मुलीचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर मुलीचा मृतदेह हा खारघरमध्ये सापडला होता.
Sairat in Mumbai… love marriage… this terrible act done by the family…