शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मी ससूनमध्ये पळून गेलो नाही तर मला पळवले गेले…ललित पाटील याने केला धक्कादायक गौप्यस्फोट

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 18, 2023 | 2:33 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 37

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ड्रग्स माफिया ललित पाटील याने मी ससूनमध्ये पळून गेलो नाही तर मला पळवले गेल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे मला पळवण्यात कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगणार असल्याचेही त्याने सांगितल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज दुपारी त्याला अंधेरी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ललित पाटीलने याच्या वकीलांन सुद्दा सर्व आरोप फेटाळून लावल्याची माहिती दिली. पुणे पोलिसांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्याने केला. मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं असा गंभीर आरोपही त्याने केल्याचे वकिलांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बंगळुरू मध्ये रात्री त्याला अटक केली. त्यानंतर हा गौप्यस्फोट झाला.

अगोदर भाऊ अटकेत
या अगोदर ललित पाटीलचा भाऊ व ड्रग्सचा कारखाना चालवणाऱ्या भूषण पाटील व अभिषेख बलकवडे याला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून त्याला अटक केली होती. आता मुख्य फरार आरोपी ललित पाटीलला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ललित अडकला. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरुन कॅाल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत तीन पथके तयार करुन त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिक पोलीस ललित पाटीलचा शोध घेत होते. त्यानंतर १५ दिवसांनी पोलिसांना ललित पाटील याला पकडण्यात यश मिळाले. काही दिवसांपूर्वी साकीनाका पोलिसांनी नाशिकमधून ३०० कोटींचे ड्रग्स जप्त केले होते. त्या प्रकरणात हे आरोपी होते. ललित पाटील आणि भूषण पाटील हे एम डी ड्रग्स बनवत होते. नाशिक येथील शिंदे पळसे परिसरात श्री. गणेशाय इंडस्ट्रीज या नावाने कंपनी चालू केली होती. का कारखान्यात हे भाऊ ड्रग्सची निर्मिती करत होते. साकीनाका पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हा कारखाना उद्धवस्त केला.

नाशिक पोलिसांनी केली होती झाडाझडती
दरम्यान नाशिक पोलिसांनी ललित पाटील याच्यासह त्याच्या तीनही आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली होती. पोलिसांनी या आरोपींच्या घरातून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करत त्यातील डेटा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी काल केला होता. त्याचप्रमाणे एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ५ कोटीच्या आसपास ड्रग्ज साहित्य जप्त केले होते. त्यानंतर ब-याच कारवाया करण्यात आल्या व अजूनही त्या सुरु आहे. पण, यातील मुख्य आरोपी ललित पाटील मिळत नव्हता. त्याला आता पोलिसांनी गजाआड केले आहे.

असे आहे ललित पाटील याचे कारनामे
कुख्यात ड्रग्स माफिया ललित पाटील अनेक कारनामे केले आहे.ललितला तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवाडा कारागृहात करण्यात आली. पण पुढे प्रकृतीच्या कारणाने त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून तो ससून रुग्णालयात कैद्यांसाठी असलेल्या १६ नंबरच्या वॉर्डमध्ये उपचार घेत होता. विशेष म्हणजे त्याला आधीच डिस्जार्ज द्यायला पाहिजे होता. मात्र ससूनमध्ये राहून ड्रग्स रॅकेट चालविण्यासाठी त्याने डॉक्टरांना मॅनेज केले.

डॅाक्टरांना पैसे द्यायचा
त्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा मध्यस्थ म्हणून वापर केला. हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा काही साधासुधा नाही. त्यानेही चांगली माया जमवलेली आहे. तो ब्रांडेड कारमधून रुग्णालयात येतो. त्यानेच अतिवरिष्ठांना मॅनेज केले आणि ललित पाटीलला ससूनमध्ये ठेवण्यासाठी दररोज ७० हजार रुपये मिळतील असे सांगितले. त्यानुसार ललित पाटील या रुग्णालयातील अतिवरीष्ठ डॉक्टरांना दररोज ७० हजार प्रमाणे आठवड्याचे पैसे रोख द्यायचा.

मेफेड्रॉन ड्रग्सची तस्करी
त्या जोरावर ललित पाटील ससून रुग्णालयातून मेफेड्रॉन ड्रग्सची तस्करी करायचा, असे उघडकीस आले आहे. या वॉर्डात त्याची पूर्ण बडदास्त ठेवण्यात आली. विशेष म्हणजे ड्रग्स नेटवर्क संपर्कात ठेवण्यासाठी त्याच्याकडे सव्वादोन लाख रुपयांचे मोबाईल्सही होते.
Lalit Patil made a shocking secret explosion

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत २१ ऑक्टोबर रोजी वणी येथे ‘जागर स्त्री शक्तीचा’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

अदानींमुळे वाढले वीजदर…कसे काय…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Shirdi Sai baba e1727984889927
संमिश्र वार्ता

साईबाबा संस्थानच्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शिर्डीतील वाहतूक सुरळीत….

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल… अनेक मार्गावर वाहतुकीत बदल

ऑगस्ट 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना शुभ समाचार मिळेल, जाणून घ्या, शुक्रवार, २९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
Next Post
vijpuravatha

अदानींमुळे वाढले वीजदर…कसे काय…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011