गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ड्रग माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक… मुंबई पोलिसांची कारवाई… असे आहे त्याचे कारनामे

by India Darpan
ऑक्टोबर 18, 2023 | 10:11 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 37

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या अंतर्गत ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक केल्याची माहिती पुढे आली आहे. या अगोदर ललित पाटीलचा भाऊ व ड्रग्सचा कारखाना चालवणाऱ्या भूषण पाटील व अभिषेख बलकवडे याला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून त्याला अटक केली होती. आता मुख्य फरार आरोपी ललित पाटीलला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ललित अडकला. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरुन कॅाल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंतर साकीनाका पोलिांनी प्रचंड गोपनीयता बाळगत तीन पथके तयार करुन त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिक पोलीस ललित पाटीलचा शोध घेत होते. त्यानंतर १५ दिवसांनी पोलिसांना ललित पाटील याला पकडण्यात यश मिळाले. काही दिवसांपूर्वी साकीनाका पोलिसांनी नाशिकमधून ३०० कोटींचे ड्रग्स जप्त केले होते. त्या प्रकरणात हे आरोपी होते. ललित पाटील आणि भूषण पाटील हे एम डी ड्रग्स बनवत होते. नाशिक येथील शिंदे पळसे परिसरात श्री. गणेशाय इंडस्ट्रीज या नावाने कंपनी चालू केली होती. का कारखान्यात हे भाऊ ड्रग्सची निर्मिती करत होते. साकीनाका पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हा कारखाना उद्धवस्त केला.

नाशिक पोलिसांनी केली होती झाडाझडती
दरम्यान नाशिक पोलिसांनी ललित पाटील याच्यासह त्याच्या तीनही आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली होती. पोलिसांनी या आरोपींच्या घरातून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करत त्यातील डेटा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी काल केला होता. त्याचप्रमाणे एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ५ कोटीच्या आसपास ड्रग्ज साहित्य जप्त केले होते. त्यानंतर ब-याच कारवाया करण्यात आल्या व अजूनही त्या सुरु आहे. पण, यातील मुख्य आरोपी ललित पाटील मिळत नव्हता. त्याला आता पोलिसांनी गजाआड केले आहे.

असे आहे ललित पाटील याचे कारनामे
कुख्यात ड्रग्स माफिया ललित पाटील अनेक कारनामे केले आहे.ललितला तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवाडा कारागृहात करण्यात आली. पण पुढे प्रकृतीच्या कारणाने त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून तो ससून रुग्णालयात कैद्यांसाठी असलेल्या १६ नंबरच्या वॉर्डमध्ये उपचार घेत होता. विशेष म्हणजे त्याला आधीच डिस्जार्ज द्यायला पाहिजे होता. मात्र ससूनमध्ये राहून ड्रग्स रॅकेट चालविण्यासाठी त्याने डॉक्टरांना मॅनेज केले.

डॅाक्टरांना पैसे द्यायचा
त्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा मध्यस्थ म्हणून वापर केला. हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा काही साधासुधा नाही. त्यानेही चांगली माया जमवलेली आहे. तो ब्रांडेड कारमधून रुग्णालयात येतो. त्यानेच अतिवरिष्ठांना मॅनेज केले आणि ललित पाटीलला ससूनमध्ये ठेवण्यासाठी दररोज ७० हजार रुपये मिळतील असे सांगितले. त्यानुसार ललित पाटील या रुग्णालयातील अतिवरीष्ठ डॉक्टरांना दररोज ७० हजार प्रमाणे आठवड्याचे पैसे रोख द्यायचा.

मेफेड्रॉन ड्रग्सची तस्करी
त्या जोरावर ललित पाटील ससून रुग्णालयातून मेफेड्रॉन ड्रग्सची तस्करी करायचा, असे उघडकीस आले आहे. या वॉर्डात त्याची पूर्ण बडदास्त ठेवण्यात आली. विशेष म्हणजे ड्रग्स नेटवर्क संपर्कात ठेवण्यासाठी त्याच्याकडे सव्वादोन लाख रुपयांचे मोबाईल्सही होते.
Drug mafia Lalit Patil arrested from Chennai… Mumbai police action…

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवल्यात कोटमगावच्या यात्रेत दुचाकीच्या सीटमध्ये घुसला नाग (बघा व्हिडिओ)

Next Post

शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषीमंत्र्यांनी कृषी विभागाला दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठक 1 750x375 1

शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषीमंत्र्यांनी कृषी विभागाला दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011