इंडिया दर्पण ऑनाईन डेस्क
मु्ंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच नेते राहुल गांधी कायम उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आरोप करत असतात. यापूर्वी त्यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घनिष्ठ संबंधांवर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी एक अजब दावा केला आहे. त्यानुसार, अदानी यांच्यामुळे वीजदर वाढले आहेत.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा देशातील नामवंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौतम अदानी यांना फायदा पोहोचवण्यासाठीच देशातील नागरिकांना वीज महागात मिळत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. राहुल यांनी यापूर्वीही थेट संसदेतून अदानींवर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. अदानी आणि अंबानी हे मोदींचे जवळचे मित्र असल्याचंही ते वारंवार सांगत असतात.
आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी ३२,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोप लावला आहे. त्यामुळे, अदानी पुन्हा चर्चेत आले आहेत. केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत देशात सर्वसामान्य नागरिकांना वीज महाग होण्याच्या पाठिमागे अदानींचा हात आहे. तर, अदानींना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. राहुल गांधींनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकार आणि उद्योगपती अदांनीवर निशाणा साधला. अदानी आणि कोळशाच्या वाढीव दरासंदर्भात त्यांनी फायनेन्शियल टाइम्सच्या बातमीचा दाखला दिला. अदानी हे इंडोनेशियातून कोळशाची खरेदी करतात आणि तोच कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट होते, असे राहुल गांधीनी सांगितले.
दर्शविली कोळशाची चुकीची किंमत
कोळशाची चुकीची आणि वाढीव किंमत दाखवून अदानींनी भारतीय नागरिकांच्या खिशातून १२ हजार कोटी रुपये काढले आहेत. म्हणूनच देशातील वीजेच्या वाढीव किंमतीच्या पाठिमागे अदानीच आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच, आम्ही लोकांना सबसिडी देत आहोत, पण अदानी किंमत वाढवत आहेत, पण पंतप्रधान गप्प का आहेत? असा सवालही राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत विचारला.
Electricity rates increased due to Adani…how…