शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

काय सांगता! एका मिनिटात डोक्यावर फोडले चक्क ६८ नारळ…पण का? (बघा व्हिडिओ)

ऑक्टोबर 18, 2023 | 12:51 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 98

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – विविध प्रकारचे साहस करून विश्वविक्रम करणाऱ्यांमध्ये भारतीय काही मागे नाहीत. दररोज देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात असा एखादा प्रयोग होतच असतो. कधी कुणी हाताने विटा फोडतो, कुणी डोक्याने नारळ फोडतो तर कुणी आगीसोबत खेळताना दिसतो. आता कर्नाटकच्या एका व्यक्तीने लोकांच्या डोक्यावर ठेवलेले नारळ ननचाकूने फोडण्याचा विक्रम केला आहे.

या विश्वविक्रमाची नोंद गिनेस वर्ल्ड रेकॉर्डने घेतली असून आपल्या अधिकृत एक्स हँडलवर त्याचा व्हिडियो देखील शेअर केला आहे. के. व्ही. सैदालवी असे या विश्वविक्रमविराचे नाव असून तो कर्नाटकातील मद्दूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. यासंदर्भातील व्हिडियोनुसार, सैदालवी यांनी एका मिनिटांत ६८ नारळ फोडण्याचा विक्रम रचल्याचे दिसत आहे. सहा लोक काळे टी-शर्ट घालून एका वर्तुळात बसले आहेत.

प्रत्येकाच्या डोक्यावर नारळ आहेत. सैदालवी वर्तुळाच्या मध्ये उभे असून ते तरुणांच्या डोक्यावर ठेवलेले नारळ फोडत आहेत. एक नारळ फुटले की लगेच दुसरे नारळ त्यांच्या डोक्यावर ठेवले जात आहे. हा विक्रम रचण्यासाठी त्यांनी ननचाकूचा वापर केल्यामुळे विशेष दखल घेतली गेली आहे. व्हिडियो बघताना देखील अंगावर शहारे येतील इतका तो भयंकर आहे. आजपर्यंत डोक्याने नारळ फोडण्याचे अनके विक्रम झालेले आहेत. मात्र सैदालवी यांनी यापूर्वी देखील असाच विक्रम केला होता आणि आता देखील त्यांनी हाच विक्रम केला आहे.

आपलाच विक्रम मोडला!
या वर्षाच्या सुरुवातीला सैदालवी यांनी हाच विक्रम रचला होता. त्याचीही गिनेस वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली होती. त्यावेळी त्यांनी एका मिनिटांत ४२ नारळ फोडण्याचा विक्रम रचला होता. आता त्यांनी एका मिनिटांत ६८ नारळ फोडून आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वीचा विक्रम त्यांनी इटली येथे झालेल्या ‘लो शो देई रेकॉर्ड’ या टॅलेंट शोमध्ये नोंदवला होता. त्याही वेळी गिनेस वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याची नोंद घेतली होती आणि आताही ही नोंद घेण्यात आली आहे.
What do you say! 68 coconuts were broken on the head in one minute… but why?

New record: Most coconuts on heads smashed with a nunchaku in one minute – 42 by KV Saidalavi (India) 🥥

He starts slow, but once he gets going there is no stopping 💪 pic.twitter.com/IRmlLtxLPl

— Guinness World Records (@GWR) October 1, 2022
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाचन प्रेरणा दिवस दुबई, युएई येथे अनोख्या रीतीने संपन्न

Next Post

राष्ट्रीय ग्राहक आयोगाने या इन्शुरन्स कंपनीला ५ कोटी रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचे दिले आदेश… बघा संपूर्ण निकाल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Untitled 99

राष्ट्रीय ग्राहक आयोगाने या इन्शुरन्स कंपनीला ५ कोटी रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचे दिले आदेश… बघा संपूर्ण निकाल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011