नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -वाघांच्या संवर्धनाच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की भारतातील वाघांची संख्या गेल्या काही काळात वाढत आहे. ते म्हणाले की भारतातील 57 व्या व्याघ्र प्रकल्पाची भर ही निसर्गाची काळजी घेण्याच्या आपल्या शतकानुशतकाच्या जुन्या प्रथेनुसार आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले: “निसर्गाची काळजी घेण्याच्या आपल्या शतकानुशतकांच्या जुन्या संस्कारांनुसार, पर्यावरण प्रेमींसाठी एक अद्भुत बातमी आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे भारतातील वाघांची संख्या कालपरत्वे वाढत आहे आणि मला खात्री आहे की ही भावना पुढेही कायम राहील.