विशेष प्रतिनिधी, मुंबई
स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ती टिकवून जास्तीत जास्त उत्पादनांची विक्री करण्यासाठी सर्वच उद्योग प्रयत्नशील असतात. गेल्या दीड वर्षांत कोरोना महामारीमुळे बहुतांश सर्वच उद्योग ठप्प आहेत. यातून ऑटोमोबाईल म्हणजेच वाहन उद्योगही सुटलेला नाही. अनेक प्रयत्न केल्यानंतरही वाहनांच्या विक्रीत वाढ झालेली नाही. परंतु २०२० च्या तुलनेत परिस्थितीत थोडी सुधारणा झालेली आहे. संकट हीच संधी मानून काही वाहन निर्माता कंपन्यांनी देशात अनेक कार लाँच केल्या. मागणी वाढल्याने काही कारच्या प्रतीक्षेचा वेळ वाढला आहेत. आम्ही तुम्हाला देशातील प्रतीक्षेचा वेळ वाढलेल्या तीन कारबाबत माहिती देणार आहोत.
महिंद्रा थार
या यादीमध्ये पहिल्या स्थानावर महिंद्रा थार आहे. महिंद्राच्या नव्या कारपैकी थार ही कार सर्वाधिक लोकप्रिय झालेली आहे. या कारला गेल्यावर्षी लाँच करण्यात आले होते. या कारचा प्रतीक्षेचा वेळ तेव्हापासून आतापर्यंत ६ महिने ते १ वर्षांपर्यंत आहे. सध्या थारची किंमत १२.११ लाख ते १४.१६ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
