पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक जण आपआपला व्यवसाय वाढून भरभरून यश मिळवावे. आणि संपत्ती दिवसेंदिवस वाढत जावी असे स्वप्न बघत असतो, गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर भारतीय महिलांनीही आर्थिकदृष्या बळकट बनत जगभरातील श्रीमंतांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. HCL Technologies च्या चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा 84,330 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरून इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत महिलांचे संकलन असलेल्या ‘आघाडीच्या श्रीमंत महिलांची यादी जारी केली. यामध्ये ८४ हजार कोटींच्या संपत्तीसह रोशन नादर मल्होत्रा या यादीत अव्वल स्थानावर आहेत. याशिवाय किरण मुझुमदार शॉ, फाल्गुनी नायर, वंदना लाल, रेणू मुंजाल यांचीही नाव आघाडीवर आहेत.
यात प्रकाशित करण्यात आलेल्या यादीनुसार HCL टेक्नॉलॉजीजच्या रोशनी नादर मल्होत्रा या अव्व्ल असून त्यांची संपत्ती 84,330 कोटी इतकी आहे. त्यानंतर Nykaa च्या फाल्गुनी नायर यांची संपत्ती आहे 57,520 कोटी रुपयेस, मग किरण मुझुमदार-शॉ 29,030 कोटी रुपयांसह तिस-या क्रमांकावर आहेत, तर Divi’s Laboratories’s च्या निलिमा यांची 28 हजार 180 कोटी, Zoho’s च्या राधा वेम्बूची 26,620 कोटी, USV च्या लीना गांधी तिवारींची संपत्ती आहे 24,280 कोटी, तर मेहेर अॅने 14,530 कोटी, न्यू कॉन्फ्लुएंट्सच्या नेहा नारखेडे 13,380 कोटी या यादीत आहेत.
रोशनी नादर मल्होत्रा हिने सलग दुस-या वर्षी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर फाल्गुनी नायर ही देशातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला आणि जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला आहे. रोशनी नाडर ही देखील सूचीबद्ध IT कंपनीचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला आहे. लीना गांधी तिवारी या यादीतील सर्वात दानशूर महिला आहेत, ज्यांनी आरोग्य सेवेसाठी 24 कोटी रुपये दान केले आहेत. नेहा नारखेडे या यादीतील सर्वात श्रीमंत नवीन सदस्य आहेत.
31 डिसेंबर 2021 रोजी महिलांच्या संपत्तीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ‘कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून – लीडिंग वेल्थ वूमन लिस्ट’च्या तिसऱ्या आवृत्तीनुसार, त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी हे स्थान कायम ठेवले आहे. रोशनी नादर मल्होत्रा या HCL कॉर्पोरेशनच्या सीईओ आणि कार्यकारी संचालक आहेत. तसेच HCL तंत्रज्ञान आणि CSR बोर्ड समितीच्या अध्यक्षा आहेत. याशिवाय त्यांनी शिव नादर फाउंडेशनच्या विश्वस्तपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. HCAL चे संस्थापक शिव नादर यांची एकुलती एक कन्या रोशनी नादर या IT कंपनीचे नेतृत्व करत असलेल्या पहिल्या महिला आहे. 2019 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नादर 54 व्या स्थानावर होत्या.
रोशनी नादर यांचे शिखर मल्होत्रासोबत लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत. दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमधून शिक्षणानंतर, रोशनी यांनी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून कम्युनिकेशन्समध्ये पदवी मिळवली आणि नंतर केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पदवी मिळवली. तसेच एचसीएलमध्ये येण्यापूर्वी रोशनी नादर यांनी इतर अनेक कंपन्यांमध्ये निर्माता म्हणून काम केले. एचसीएलमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांना एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ आणि कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली.
या अहवालानुसार बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यांना मागे टाकून नायकाच्या फाल्गुनी नायर 57,520 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड रिच बनल्या. रिपोर्टनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या 2021 च्या आवृत्तीत कॉर्पोरेट जगतात उच्च पदांवर प्रस्थापित झालेल्या महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. यामध्ये 25 नवीन चेहऱ्यांनी स्थान मिळवले आहे, ज्यांनी 2020 मधील 100 कोटींच्या तुलनेत 2021 मध्ये 300 कोटी रुपये कट ऑफ म्हणून घेतले आहेत
देशातील 100 श्रीमंत महिलांच्या या यादीत USV चेअरपर्सन लीना गांधी तिवारी 21,340 कोटींच्या संपत्तीसह किरण मुझुमदार शॉ यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिवीजच्या लॅबोरेटरोरिजच्या संचालिका निलिमा या चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 18620 कोटी रुपये आहे. झोहोच्या राधा वेंबू 11590 कोटींच्या मालमत्तेसह पाचव्या स्थानावर आहेत आणि अरिस्ता नेटवर्क्सच्या जयश्री उल्लाल 10220 कोटींच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत.
एका अहवालामध्ये असे म्हटले आहे की, भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या 2021 च्या कॉर्पोरेट जगतात उच्च पदांवर प्रस्थापित झालेल्या महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 25 नवीन चेहऱ्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे. या यादीतील महिलांचे सध्याचे सरासरी वय पूर्वीच्या यादीच्या तुलनेत 55 वर्षांपर्यंत वाढवण्यात आले आहे. 40 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या 20 पैकी 9 महिला सेल्फमेड रिच आहेत.श्रीमंत महिलांच्या यादीतील 12 महिला फार्मास्युटीकल उत्पादनाशी उद्योगाशी संबंधित आहे. तर महिला 11 आरोग्यसेवेशी संबंधित आहेत. तसेच 9 महिला ग्राहकोपयोगी वस्तूंशी संबंधित आहेत.
India’s Most Richest Women Roshni Nadar Malhotra
HCL Technologies