नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमध्ये भारतातील पहिल्या ‘वॉटर मेट्रो रेल्वे सेवे’चे उद्घाटन करणार आहेत. पारंपारिक मेट्रो रेल्वेमध्ये अनेक अडथळे असलेल्या अशा शहरांसाठी ही सेवा अतिशय उपयुक्त मानली जाते. वॉटर मेट्रो रेल्वे सेवा नक्की कशी आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याविषयी जाणून घेऊया-
कोची वॉटर मेट्रो शहराच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. ११३६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प केरळसाठी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात आहे. सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटनाच्या माध्यमातून शहरातील आर्थिक उपक्रमांना चालना मिळू शकेल. कोची आणि जवळपासच्या दहा बेटांदरम्यान वॉटर मेट्रो सुरू होत आहे. कोची वॉटर मेट्रो पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि विट्टीला-कक्कनड टर्मिनल दरम्यान सुरू होईल
https://twitter.com/DDNewslive/status/1650112360336740355?s=20
वॉटर मेट्रोवरील प्रवासाचे किमान भाडे २० रुपये आहे, जे नियमित प्रवासी आहेत, ते बस किंवा लोकल ट्रेनसारखे साप्ताहिक आणि मासिक पास देखील घेऊ शकतात. साप्ताहिक भाडे १८० रुपये असेल, तर मासिक भाडे ६०० रुपये असेल, तर तिमाही भाडे १५०० रुपये असेल. एवढेच नाही तर प्रवाशांना एकच स्मार्ट कार्ड वापरून कोची मेट्रो ट्रेन आणि वॉटर मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही कोची वन अॅप वापरू शकता.
वॉटर मेट्रो म्हणून चालवल्या जाणार्या बोटी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधल्या आहेत. केरळ सरकारने जर्मनीच्या KFW च्या सहकार्याने या प्रकल्पाला निधी दिला आहे. यासाठी सुमारे ११३७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. वॉटर मेट्रो प्रथम ८ इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींसह सुरू होईल, नंतर त्यांची संख्या वाढविली जाईल. मेट्रो ट्रेनप्रमाणे ती पूर्णपणे वातानुकूलित असेल आणि दररोज १५ मिनिटांच्या अंतराने १२ तास धावेल. सध्या २३ बोटी आणि सुरुवातीला १४ टर्मिनल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मेट्रोमध्ये ५० ते १०० प्रवासी बसू शकतात.
https://twitter.com/DDNewslive/status/1650497789736939525?s=20
शहराच्या गरजेनुसार वाहतूक व्यवस्था
मेट्रो लाइट
ही सेवा गोरखपूर आणि जम्मूमध्ये प्रस्तावित आहे. पारंपारिक मेट्रोच्या बरोबरीने अनुभव, आराम, सुविधा, वक्तशीरपणा, विश्वसनीयता, सुरक्षितता आणि पर्यावरण संरक्षण अशी तिची वैशिष्ट्ये आहेत. टियर २ आणि जम्मू, श्रीनगर, गोरखपूर सारख्या लहान शहरांसाठी तिची योजना आहे. एका वेळी जास्तीत जास्त १५ हजार लोकांना सेवा मिळेल. पारंपारिक मेट्रोपेक्षा ४०% कमी खर्चाची ही योजना आहे.
मेट्रो निओ नाशिक मध्ये
रबरी चाके असलेली ही मेट्रो सेवा ओव्हरहेड ट्रॅक्शन लाइनमधून वीज घेऊन रस्त्याच्या स्लॅबवर चालवली जाईल. पारंपरिक मेट्रोसारख्या सुविधा त्यात असतील. नाशिकमध्ये ही सेवा सर्वप्रथम देण्यात येणार आहे. ही इलेक्ट्रिक बस ट्रॉलीसारखी असेल. एका वेळी जास्तीत जास्त आठ हजार प्रवासी घेऊन जातील असी तिची क्षमता आहे.
https://twitter.com/sarbanandsonwal/status/1650716330079969280?s=20
स्थानिक जलद वाहतूक व्यवस्था:
देशात प्रथमच लोकल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा आरआरटीएसच्या माध्यमातून दोन शहरे मेट्रोने जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि मेरठ मध्ये ती प्रस्तावित आहे. स्थानिक पातळीवर विकासाला गती मिळणे अपेक्षित आहे. नागरिकांनाही उत्तम वाहतूक सेवा मिळू शकणार आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1650118974397636609?s=20
Indias First Water Metro Railway Kerala Features