मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील पहिली हायपर मॅक्सी स्कूटर ‘एच२’ सादर करण्यात आली आहे. हायपर-स्पोर्ट्स बाइकची झलक दाखवल्यानंतर ट्रूव्ह मोटर आता लवकरच एच२ लाँच करणार आहे. आणखी एक अत्यंत उत्साहवर्धक टीझर दाखवण्यासाठी सज्ज आहे. ही भावी स्कूटर भारतामध्ये बेंगळुरूमधील ट्रुव्हच्या आरअॅण्डडी केंद्र येथे डिझाइन करण्यात आली आहे.
या ई-स्कूटरमध्ये आकर्षक वैशिष्ट्यांसह लिक्विड-कूल्ड मोटर, सिंगल-स्पीड ट्रान्समिशन, अपसाइड-डाऊन फोर्क, मोनो-शॉक रिअर व एलईडी हेडलाइट्स आहेत. या स्कूटरमध्ये सर्वोत्तम स्टार्ट व ब्रेक फीलसाठी २-पिस्टन कॅलिपर्स आहेत. ४.८ केडब्ल्यूची सतत शक्ती आणि ७.९ केडब्ल्यूच्या सर्वोच्च शक्तीसह स्कूटर ४.३ सेकंदांमध्ये ० ते ६० किमी/तास गती प्राप्त करू शकते आणि १३० ते २३० किमी अंतरापर्यंत जाऊ शकते. तसेच या स्कूटरमध्ये ४जी कनेक्टीव्हीटी असण्यासोबत राइडर्सना प्रगत इंटरनेटचा पाठिंबा असलेली वैशिष्ट्ये देण्यासाठी बिल्ट-इन गुगल आहे.
एच२ च्या प्री-बुकिंगला ऑगस्ट २०२२ मध्ये सुरूवात होईल. स्कूटर्स २०२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये रत्स्यावर धावेल अशी अपेक्षा आहे. पण संभाव्य ग्राहक आजच www.trouvemotor.com या वेबसाइटवर त्यांची रूची व्यक्त करू शकतात आणि लवकर प्री-बुकिंग सुविधा प्राप्त करू शकतात, तसेच सानुकूल ट्रूव्ह मर्चंडाइज जिंकण्याची संधी देखील मिळवू शकतात.
ट्रूव्ह मोटरचे संस्थापक अरूण सन्नी म्हणाले, “मागील काही वर्षांमध्ये भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी विभागाने अपवादात्मक वाढ केली आहे. एकट्या २०२१ मध्ये या विभागाने व्यापक १३२ टक्क्यांच्या वाढीची नोंद केली, ज्यामधून दिसून येते की वर्ष २०२२ अधिक सर्वोत्तम असणार आहे. आणि आमच्या इलेक्ट्रिक मॅक्सी-स्कूटर्सच्या लाँचसह आमचा या विकासगतीप्रती योगदान देण्यासोबत अधिक नवोन्मष्कार आणत या क्षेत्रामध्ये अधिक क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा मनसुबा आहे.”
ट्रूव्ह मोटर सध्या मॅक्सी-स्कूटर विभागामध्ये तीन अधिक मॉडेल्सवर काम करत आहेत, जे पुढील वर्षी लाँच करण्यात येतील. आपल्या दृष्टीकोनाला अधिक दृढ करत कंपनी ३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स उभारण्याच्या प्रक्रियेत आहे आणि भारतातील व परदेशातील कंपन्यांसोबत डिलरशिप सहयोग करण्याचा प्रयत्न करत आहे.