इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्ही तुमची पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. टाटा मोटर्सने अखेर आपली बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत ८.४९ लाख रुपये आहे. ही कार अवघ्या ५७ मिनिटात चार्ज होईल आणि एकदा चार्जिंग केल्यावर ३१५ किमीची रेंज देईल. या कारचे बुकिंग आजपासून (१० ऑक्टोबर) सुरू झाले आहे. तर, जानेवारी २०२३ पासून या कारचे वितरण केले जाईल.
https://twitter.com/TipuVaranasi/status/1575094671763996672?s=20&t=q1Hg5P5rO2dZF_OCZdSSrw
एकूण ७ प्रकारात उपलब्ध
टाटा कंपनीने ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ७ प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग पर्यायांसह ती उपलब्ध असेल. त्यात XE, XT, XT, XZ+, XZ+Tech LUX, XZ+ आणि XZ+Tech LUX व्हेरियंटमध्ये येईल. त्याच वेळी, १९.२ KWh ते २४ KWh पर्यंतच्या बॅटरी पॅकचा पर्याय असेल. यामध्ये ३.३ KV AC ते ७.२ KV AC पर्यंत चार्जिंग पर्याय मिळतील. या कारची किंमत ८.४९ लाखांपासून ११.७९ लाख रुपयांच्या दरम्यान असेल.
अशी आहेत वैशिष्ट्ये
– टियागो इलेक्ट्रिक कारमध्ये दोन ड्रायव्हिंग मोड मिळतील. ही कार अवघ्या ५.७ सेकंदात ० ते ६० kmph चा वेग पकडेल. यात ८ स्पीकर सिस्टम, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, इलेक्ट्रिक ORVM आणि बरेच काही मिळते.
– टाटा मोटर्सच्या दाव्यानुसार, ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या कारला १,६०,००० किमी पर्यंत बॅटरी आणि मोटर वॉरंटी उपलब्ध असेल. कारच्या पहिल्या १० हजार बुकिंगपैकी २ हजार युनिट्स विद्यमान टाटा ईव्ही वापरकर्त्यांसाठी राखीव असतील.
– कारच्या बॅटरी आणि मोटर्सवर ८ वर्षे आणि १,६०,००० किमीची वॉरंटी देत आहे. कार १९.२ KWh बॅटरी पॅकवर २५०km आणि २४ KWh बॅटरी पॅकवर ३१५km ची रेंज देईल. तुम्ही ते घरच्या १५A सॉकेटमधून चार्ज करू शकाल.
https://twitter.com/Tatamotorsev/status/1579358567353696257?s=20&t=mF7yYWAMficsMEVVMwGmgQ
India’s First Cheapest EV Car TaTa Tiago Booking Started