मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात पहिले Apple Store उघडले आहे. ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भारतातील पहिल्या ऍपल स्टोअरचे उद्घाटन केले. बीकेसीमध्ये सुरू झालेल्या या अॅपल स्टोअरला अॅपल बीकेसी असे नाव देण्यात आले आहे. हे मुंबईचे एक मोठे व्यावसायिक केंद्र आहे आणि येथे खूप गर्दी असते. हे स्टोअर अतिशय आलिशान आणि ऊर्जा-कार्यक्षम डिझाइनमध्ये बनवण्यात आले आहे. हे स्टोअर ‘रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल’मध्ये आहे.
अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उघडलेल्या नवीन अॅपल स्टोअरसाठी कंपनीला दरमहा मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. रिपोर्टनुसार, अॅपल कंपनी अंबानी कुटुंबाला अॅपल स्टोअरसाठी दरमहा सुमारे ४२ लाख रुपये भाडे देणार आहे. या स्टोअरसाठी अॅपलने अंबानीसोबत सुमारे २०,८०० स्क्वेअर फूट जागेसाठी ११ वर्षांचा करार केला आहे. स्टोअर क्षेत्रासाठी किमान मासिक भाडे सुमारे ४२ लाख रुपये आहे. त्यानंतर दर तीन वर्षांनी भाडे १५ टक्क्यांनी वाढणार आहे. याशिवाय, अॅपलला पहिल्या तीन वर्षांसाठी २ टक्के आणि पहिल्या तीन वर्षानंतर २.५ टक्के महसूल द्यावा लागेल.
ऍपलचा मुंबईतील अंबानींच्या मालकीच्या मॉलशी ११ वर्षांचा करार हा त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध एक कठीण पाऊल आहे. टेक जायंटने मॉलमध्ये एक ‘एक्सक्लुझिव्ह झोन’ भाड्याने दिला आहे जो २२ स्पर्धक ब्रँड्स जसे की Facebook, LG, Microsoft, Amazon, Google आणि Sony यांना जागा घेण्यापासून किंवा कोणत्याही जाहिराती प्रदर्शित करण्यापासून प्रतिबंधित करेल.
अॅपल स्टोअर सुरू होण्याच्या एक दिवस आधी सोमवारी टीम कुक मुकेश अंबानींच्या घरी पोहोचले. अँटिलियाचे काही फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले होते, ज्यामध्ये आकाश अंबानी आणि ईशा अंबानी अॅपलच्या सीईओसोबत दिसत होते. या भावंडांना नंतर सीईओ टीम कूकची भेट घेताना दिसले.
https://twitter.com/RajivMakhni/status/1647920703021416449?s=20
India’s First Apple Store Open in Mumbai BKC Monthly Rent