मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिटेल डिजिटल रुपयाचे देशात लॉन्च झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिल्याच दिवशी १.७१ कोटी रुपयांचा डिजिटल रुपीच्या माध्यमातून व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. या डिजिटल रुपयाची मागणी सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये समाविष्ट असलेल्या फक्त चार बँकांनी निवडक शहरांसाठी करण्यात आली आहे.
याविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात बँकांकडून वाढत्या मागणीचा विचार करता रिझर्व्ह बँक आणखी डीजिटल रुपी जारी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात डिजिटल रुपये दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या शहरांमध्ये चार बँकांच्या माध्यमातून डिजिटल करन्सी उपलब्ध करुन दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात देशातील चार शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, यस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या माध्यमातून डिजिटल रुपी उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनाही पायलट प्रोजेक्टमध्ये समाविष्ट केलं जाईल. दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद, गंगटोक, हैदराबाद, गुवाहाटी, कोच्ची, इंदौर, लखनौ, पाटणा आणि शिमला या शहरांचाही समावेश केला जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येणारा ई – रुपी एक डिजिटल टोकनसारखं काम करेल. सीबीडीसी आरबीआयच्यावतीनं जारी करण्यात येणाऱ्या करन्सी नोटचं हे डिजिटल स्वरुप आहे. डिजिटल रुपीची देवाणघेवाण पर्सन – टू – पर्सन आणि पर्सन – टू – मर्चंट अशा दोन्ही माध्यमातून करता येते. याशिवाय तुम्हाला जर मर्चंटला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीकडील क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करू शकता. डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण बँकांच्या ई-वॉलेटच्या माध्यमातून केली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेला डिजिटल रुपात विकसित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचं हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
कागदी नोटांप्रमाणेच असणार मूल्य
कागदी नोटांच्या समान डिजिटल रुपयाचं मूल्य आहे. त्यामुळेच डिजिटल रुपी देऊन तुम्ही कागदी नोटदेखील घेऊ शकता. रिझर्व्ह बँकेनं डिजिटल करन्सीची दोन विभागात वर्गवारी केली आहे. CBDC-W आणि CBDC-R असे डिजिटल रुपीचे दोन प्रकार आहेत. CBDC-W म्हणजे होलसेल करन्सी आणि CBDC-R म्हणजे रिटेल करन्सी आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं १ नोव्हेंबर रोजी होलसेल ट्रान्झाक्शनसाठी डिजिटल रुपया लॉन्च केला होता.
e₹-R: Retail #DigitalRupee
?Transactions via a digital wallet, offered by participating banks, stored on mobiles/devices
?Physical cash-like features: Trust, Safety, settlement finality https://t.co/7LwGBbqjLA
3/3 pic.twitter.com/sQfKiaL5mm
— PIB India (@PIB_India) December 2, 2022
India’s Digital Rupee Features How to Use