मुंबई – आजच्या काळात प्रत्येकालाच आपल्याकडे कार असावी असे वाटते. स्वतःचे वाहन असल्यास कुठेही जाण्याची तात्काळ सोय होऊ शकते. स्वस्त आणि चांगली कार उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. सध्या मारुती सुझुकी अल्टो ही देशातील सर्वात स्वस्त कार बाजारात उपलब्ध आहे. ग्राहकांना ही कार स्वस्त खरेदी करण्याची संधी निर्माण झाली आहे. मारुती सुझुकी ऑगस्टमध्ये मारुती सुझुकी अल्टोसह विविध वाहनांवर सूट देत आहे. या कारवर आपण ४० हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतो. त्याची किंमत आणि तपशील जाणून घेऊ या..
असी आहे ऑफर
मारुती सुझुकी अल्टोची किंमत 2.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन जास्तीत जास्त 4.70 लाख रुपयांपर्यंत पर्यंत जाते. यात पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये असून कंपनी ऑगस्टमध्ये या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 25 हजार रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे. तर सीएनजी व्हेरिएंटवर फक्त 5 हजार रुपयांची रोख सवलत मिळेल. फोनवर बुकींग केल्यास 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील आहे. अशा प्रकारे, ग्राहक कारच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 40 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
इंजिन आणि मायलेज
यात कारला 796 सीसी पेट्रोल इंजिन मिळाले असून 48 पीएस पॉवर आणि 69 एनएम टॉर्क जनरेट करते. पेट्रोल व्हेरिएंट 22 किमी पर्यंत मायलेज देते. यात सीएनजी पर्यायामध्ये देखील पर्याय देण्यात येत असून त्यामध्ये ते 41 पीएस पॉवर आणि 60 एनएम टॉर्क तयार करते. त्यामुळे सीएनजी मध्ये 31 किमी प्रति 1 तासा पर्यंत मायलेज देते.
अन्य वैशिष्ट्ये
मारुती अल्टोच्या टॉप व्हीएक्सआय प्लस व्हेरिएंटमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यात कीलेस एंट्री आणि फ्रंट पॉवर विंडो देखील मिळतात. सुरक्षेसाठी या कारला ड्रायव्हर साइड एअरबॅग आणि मागील पार्किंग सेन्सर सारखी वैशिष्ट्ये मिळतात. त्याची थेट स्पर्धा रेनॉल्ट क्विड आणि डॅटसन रेडी-जीओ सारख्या वाहनांशी आहे.
(अधिक माहितीसाठी जवळच्या मारुती शोरुमशी संपर्क साधावा)