पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – मोबाईलचा प्रचंड प्रमाणात वापर वाढल्याने अनेक मोबाईल कंपन्या आपले वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल फोन बाजारात आणत आहेत, त्यात भारतीय आणि परदेशी कंपन्यांचा समावेश असून या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा दिसून येत आहे. TECNO कंपनीने आपला नवीन आणि बजेट स्मार्टफोन TECNO SPARK 8C भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे या कंपनीचा दावा आहे की, TECNO SPARK 8C हा 6GB रॅम आणि 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. TECNO SPARK 8C मध्ये प्रत्यक्षात फक्त 3 GB RAM आहे, परंतु याला अपडेटद्वारे 3 GB व्हर्च्युअल रॅम मिळेल, त्यानंतर एकूण 6 GB RAM असेल. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसरही आहे.
TECNO SPARK 8C ची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन मॅग्नेट ब्लॅक, आयरिस पर्पल, डायमंड ग्रे आणि टर्क्युईज सायन कलरमध्ये खरेदी करता येईल. फोनची विक्री 24 फेब्रुवारी 2022 पासून Amazon.in वरून होईल. या फोनचा अन्य तपशील : या फोनमध्ये Android 11 वर आधारित HiOS 7.6 आहे. TECNO SPARK 8C मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा HD प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 480 nits आहे. यात ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, ज्याच्या मॉडेलची माहिती कंपनीने दिलेली नाही. हा फोन मेमरी फ्यूजन फीचरसह येतो. यात 6 GB RAM सह 64 GB स्टोरेज आहे.
TECNO च्या या फोनमध्ये 13MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. एआय ब्युटी 3.0, पोर्ट्रेट मोड, वाईड सेल्फी, एचडीआर, फिल्टर्स असे अनेक मोड कॅमेरासोबत उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. या फोनमध्ये IPX2 स्प्लॅश प्रतिरोधक, DTS साउंड, सोप्ले 2.0, HiParty, अँटी ऑइल स्मार्ट फिंगरप्रिंट, फेस अनलॉक, ड्युअल 4G VoLTE सह 3-इन-1 सिम स्लॉट आहे. हा फोन मॅग्नेट ब्लॅक, आयरिस पर्पल, डायमंड ग्रे आणि टर्क्युईज सायन कलरमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.