मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आगामी काळात आपण वाहतूक व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि व्यवसाय वाढवण्यासाठी वापरता येईल असे वाहन हवे असेल, तर आज आपण अशाच काही गाड्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर खासगीरित्या वाहतूकीसाठी करता येतो. तसेच व्यावसायिकदृष्ट्या देखील होऊ शकतो. कोणत्या आहेत या गाड्या आणि त्यांची खासियत काय आहे…
मारुती सुझुकी Eeco
याचा आपण व्यावसायिक वापर करू शकता. यात भरपूर जागा उपलब्ध आहे आणि त्यात भरपूर सामानही ठेवता येते. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करत असाल तर ही कार वापरू शकता. याचा वापर घरातील कामांसाठीही करू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत प्रवास करायला आवडत असेल तर हे तुमच्यासाठी योग्य वाहन ठरेल. यात 1196cc 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. तसेच Eeco ची सुरुवातीची किंमत 3.84 रुपये ( एक्स-शोरूम) आहे.
महिंद्रा बोलेरो
बोलेरो B4 BS6 (DIESEL)-2WD मध्ये BS6 अनुरूप 1.5-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 3,600 rpm वर 75 bhp ची कमाल पॉवर आणि 1,600 ते 2,200 rpm यावर 210 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. बोलेरोचे शक्तिशाली इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. सुरक्षेच्या वैशिष्ट्यांत या एसयूव्हीमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्रायव्हर एअर बॅग आणि को-ड्रायव्हर ऑक्युपंट डिटेक्शन सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडरचा समावेश करण्यात आला आहे. या SUV ची किंमत 8.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) करण्यात आली आहे.
महिंद्रा मराझो
यामध्ये, कंपनीने 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले आहे, ज्यामुळे हे इंजिन 3,500 rpm वर 121 bhp ची कमाल पॉवर आणि 1,750 ते 2,500 rpm वर 300 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह बाजारात उपलब्ध आहे. यात शक्तिशाली MPV मध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मागील पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. Mahindra Marazzo ची सुरुवातीची किंमत 12.80 रुपये ( एक्स-शोरूम) आहे.
मारुती सुझुकी एर्टिगा
मारुती सुझुकी एर्टिगा 1.5-लिटर BS6, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह देण्यात येते, हे SHVS स्मार्ट हायब्रिड वाहन आधुनिक प्रणालीशी जोडलेली आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 103 bhp ची पॉवर आणि 4,400 rpm वर 138 Nm टॉर्क जनरेट करते. त्याची सुरुवातीची किंमत 7.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.