इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आयटी, कम्प्युटर सायन्स, बी टेक यासारख्या अभ्यासक्रमांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मोठी क्रेझ आहे. या कोर्समधून पदवी घेतलेल्या तरुणांना अनेक कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारची नोकरीची ऑफर मिळते, असे गेल्या काही वर्षात दिसून येते. परंतु एखाद्या तरुणाला एक लाख नव्हे तर एक किंवा दोन लाख नव्हे तर चक्क सुमारे महिन्याचा पगार मिळाला तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
प्रत्यक्षात उत्तराखंड मधील एका तरुणाला ही सुवर्ण संधी मिळाली आहे. त्याला जर्मनीतील एका कंपनीने 23 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे म्हणजे त्याचा महिन्याचा पगार 1,92,000 यापेक्षाही जास्त होतो, त्यामुळे सर्वत्र कौतुक होत असून त्याचे सर्वत्र चर्चा सुरू आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यातील एका तरुणास वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जर्मनीतील एका नामांकित कंपनीत वार्षिक २३ कोटी रुपये पगाराची नोकरी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबात, नागरिकांमध्ये आणि मित्रमंडळींमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
यशवंत चौधरी असे या तरुणाचे नाव असून तो उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील रहिवासी आहे. जर्मनीतील टेस्ला गिगा या कंपनीत त्याला नोकरी मिळाली आहे. तो कंपनीच्या बर्लिनमधील प्रकल्पात काम करणार आहे. त्याला कंपनीने ३० लाख डॉलर म्हणजेच २३ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे.
विशेष म्हणजे त्याला मिळालेल्या या प्रचंड पॅकेजमुळे त्याचे नाव तर भारतभर दुमदुमत आहेच, तसेच चंपावत शहरात तर सध्या केवळ त्याच्या नावाची चर्चा आहे. यशवंत हा इंजिनिअर असून त्याला जर्मनीच्या टेस्ला गिगा कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर नेमणूक मिळाली आहे. ऑगस्टमध्ये बंगळुरू येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर नोव्हेंबरमध्ये बर्लिनमध्ये त्याला नियुक्ती मिळेल.
यशवंत हा चंपावतमधील प्रसिद्ध व्यापारी शेखर चौधरी यांचा व्यापाऱ्याचा मुलगा म्हणून ओळखला जातो. यशवंत याने पिथौरागढ येथे बीटेक केले. २०२० मध्ये झालेल्या गेट परीक्षेत त्याला राष्ट्रीय पातळीवर ८७० वा रँक मिळाला होता. तसेच २ वर्षांपूर्वी प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक म्हणून त्याची टेस्ला गिगा कंपनीने निवड केली होती. कोरोना काळात त्याने ऑनलाईन काम केले होते.
indian youth got 23 crore salary package work from home success story