टोकियो – भारतीय महिला संघाच्या यशाची घौडदौड कायम असून आज या संघाने ऑलिम्पिकमध्ये मोठीच कमाल केली आहे. सांघित अत्यंत शानदार खेळाच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळेच आता भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. अशा प्रकारची ऐतिहासिक कामगिरी करणारा हा एकमेव भारतीय संघ ठरला आहे. त्यामुळे भारताची आणखी एक पदक निश्चित झाले आहे.
दिग्गज असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला नमवणे हे मोठे आव्हान होते. पण, भारतीय महिला हॉकी संघाने अतिशय आश्वासात्मक खेळ केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १-० अशी मात दिली आहे. भारताची गोलकिपर सविता अतिशय भक्कम भिंतीसारखी मैदानात उभी होती. त्यामुळेच तिने ऑस्ट्रेलियाचे सर्वच गोल परतवून लावले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला एकही गोल करता आला नाही. तर, गुरजीतने अतिशय चपळाईने खेळ केला. त्यामुळेच तिने शानदार गोल करुन भारताचे गोलचे खाते उघडले. आणि हाच गोल विजयाचा शिल्पकार ठरला.
भारतीय संघाने यापूर्वी दोन सामने जिंकले होते. आता ऑस्ट्रेलियाला नमवून थेट उपांत्य फेरी गाठली आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमत भारतीय महिला संघाने अशी मोठी कामगिरी केली आहे. दरम्यान, भारतीय पुरुष संघही उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला असे दोन्ही भारतीय संघ उपांत्य फेरी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत.