इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात व्यावसायिक क्षेत्रात महिलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.अनेक सकारात्मक घटक महिलांचे परिवर्तन करत आहेत. असे असले तरी, आर्थिक निर्णय घेण्याच्या बाबतीत मात्र भारतीय महिला आजही बऱ्याच मागे आहेत. आजही महिला आर्थिक निर्णय घेण्यासाठी घरातील पुरुषांवर अवलंबून असतात हे फायनान्शियल अवेयरनेस अमंग विमेनच्या सर्वेक्षणाअंतर्गत टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सच्या (टाटा एआयए) अहवालात आढळून आले आहे.
महिलांमध्ये आर्थिक जागरूकता कितपत आहे आणि आपले स्वतःचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी महिला कितपत स्वतंत्र आहेत हे समजून घेण्यासाठी टाटा एआयए लाईफने स्पेशलाइज्ड ब्रँड रिसर्च फर्म ईरुसएम यांच्या मार्फत हे सर्वेक्षण केले. भारतातील महानगरे, प्रथम व द्वितीय श्रेणी शहरे मिळून १८ प्रमुख शहरांमधील २५ ते ५५ वर्षे वयोगटातील १००० व्यक्ती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी ४४ महिला या स्वतःचे आर्थिक निर्णय घेण्यास प्राधान्य देतात.
सर्वेक्षणातील ठळक वैशिष्ट्यानुसार लग्न झालेल्या ८९टक्के महिला आर्थिक निर्णयांसाठी त्यांच्या नवऱ्यांवर अवलंबून असतात. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, बहुतांश महिलांसाठी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असणे म्हणजे त्यांना त्यांचे आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असतेच असे नाही. नोकरी करणाऱ्या ५९टक्के जणी त्यांच्या आर्थिक बाबींचे निर्णय स्वतंत्रपणे घेत नाहीत. तृतीय श्रेणी शहरांमध्ये हे प्रमाण जास्त आहे, त्याठिकाणी नोकरी करणाऱ्या ६५टक्के महिला स्वतंत्रपणे आर्थिक निर्णय घेत नाहीत.आर्थिक साधनांपैकी बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणे हे ६२टक्के महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या फायद्याच्या दृष्टीने अधिक जास्त सुविधाजनक वाटते.
जीवन विमा पॉलिसींच्या विविध प्रकारांविषयी जेव्हा टाटा एआयए तर्फे माहिती दिली गेली तेव्हा महिलांनी युएलआयपी आणि टर्म इन्श्युरन्स यांची निवड केली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ७५% जणांनी सांगितले ‘विश्वास’ आवश्यक आहे आणि ज्या कंपनीवर विश्वास ठेवता येईल तिच्यामध्ये गुंतवणूक करणार असे आढळून आले .
टाटा एआयएचे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री. गिरीश कालरा म्हणाले की कन्ज्युमर ऑब्सेशन व्हॅल्यूच्या दृष्टीने आमच्या ग्राहकांना समजून घेणे हा घटक महत्त्वाचा आहे. आर्थिक नियोजनामध्ये महिला एक महत्त्वाच्या हितधारक आहेत पण आर्थिक नियोजन आणि जीवन विम्याच्या बाबतीत त्यांची पसंती आणि वृत्ती याबाबत खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. टाटा एआयएमध्ये आम्ही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग करून घेऊन महिलाकेंद्रित सेवासुविधा, महिलांना सक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे.
Indian Women Financial Dependent or Independent Survey Report