मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रंगीबेरंगी बाजारपेठा, समुद्रकिनारे आणि उत्तम खरेदी या गोष्टी भारतीय पर्यटकांना आकर्षित करीत असून ३१ ऑक्टोबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत प्रवासासाठी शोधण्यात आलेल्या रिटर्न इकॉनॉमी इंटरनॅशनल ठिकाणांमध्ये दुबई, बँकॉकसह सिंगापूर प्रवासाला भारतीयांनी पसंती दर्शवली आहे. तर देशांतर्ग प्रवासाकरिता गोव्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यापाठोपाठ अंदमान आणि निकोबार बेटांना स्थान दिले गेले आहे. कायक (KAYAK) या जगातील आघाडीच्या सर्च इंजिनने भारतीय पर्यटकांच्या आवडत्या पर्यटनस्थळांचा आढावा घेतला आहे.
दरम्यान कायकने स्वस्तातल्या फ्लाइट्ससाठी सर्वोत्तम प्रवास आणि बुकिंगच्या वेळादेखील जाहीर केल्या आहेत. ज्यांनी अजून आपली ट्रिप बुक केलेली नाही आणि बँकॉकसाठी ट्रिप बुक करायची आहे ते लोक मार्चच्या मध्यावर प्रवासाचा विचार करू शकतात (१३-१९ मार्च २०२३) कारण त्यांना नवीन वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत ३३ टक्के बचत करता येईल. कायक सर्च माहितीनुसार प्रवासाच्या कालावधीत कोणत्याही बुधवारी* प्रवास सुरू करणे परवडणारे ठरेल.
मालदीवचे अत्यंत सुंदर स्थान हे रिटर्न इकॉनॉमी फ्लाइटसाठी भारतातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक शोधले गेलेले स्थान असून ते मार्च २०२३ च्या मध्यावर प्रवासासाठी उत्तम ठरेल. त्यामुळे एप्रिलच्या शेवटी सर्वाधिक महागड्या कालावधीच्या तुलनेत प्रवाशांना ४९% बचत करून देईल. टोरंटो हे कॅनडातील शहर पहिल्या १० पैकी असून ते १०व्या क्रमांकावरच आहे. पुढील सहा महिन्यांत भारत आणि टोरंटो या दरम्यान सरासरी रिटर्न इकॉनॉमी फ्लाइट सुमारे ११५,३२३ रूपये असून तुमचा प्रवास सुरू करण्याची सर्वोत्तम वेळ बुधवार आहे.
कायकचे भारताचे राष्ट्रीय व्यवस्थापक तरूण ताहिलियानी यांनी सांगितले, “कायकच्या सर्च डेटामधून हे दिसून येते की, भारतीय पर्यटक पुढील ६ महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्थानांना भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. दुबई, बँकॉक आणि सिंगापूर ही लोकप्रिय ठिकाणे आहेत. परदेशी प्रवासाच्या सर्व आनंदासह तुलनेने कमी प्रवासाच्या आणि वेगवान फ्लाइट्स उपलब्ध आहेत. कायकच्या माहितीतून असे दिसून येते की, मार्चच्या सुरूवातीला प्रवास केल्यास आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर उत्तम डील्स मिळू शकतात. साधारण नववर्षाच्या आसपासच्या गर्दीच्या प्रवासाच्या तारखा टाळल्याने भारतीय प्रवाशांना सर्वोत्तम शक्य दर मिळू शकतात आणि आम्ही तुमच्या सुट्टीसाठी एका उत्तम किंमतीत तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी प्राइज एलर्ट सुरू करण्याची शिफारस करतो.”
Indian Tourism Preference Countries List
Tourist Singapore