मुंबई – जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखाली SpaceX कंपनीची सॅटेलाईट ब्रॉडबँड शाखा स्टारलिंक भारतात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. सदर कंपनी जिओ किंवा एअरटेलशी करार करण्याची शक्यता आहे.
स्टारलिंक भारतातील टेलिकॉम कंपन्यांसोबत टायअप शोधत आहे. कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकारी
संजय भार्गव (कंट्री डायरेक्टर, भारत, स्टारलिंक, SpaceX,) म्हणाले की, NITI आयोगाने फेज- 1 अंतर्गत आता 12 महत्वाकांक्षी जिल्हे ओळखल्यानंतर ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांशी चर्चा सुरू होईल आणि आम्ही विविध कंपन्या आणि USOF (युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड) च्या हिताचा आम्ही विचार करू.
संजय भार्गव पुढे म्हणाले की, आम्हाला आशा वाटते, भारतात एक कालबद्ध 100 टक्के ब्रॉडबँड योजना मिळेल, जी इतर जिल्ह्यांसाठी एक मॉडेल म्हणून काम करू शकेल. परंतु सर्व काही तपशीलांवर अवलंबून असते. एक किंवा अधिक ब्रॉडबँड प्रदाते सहकार्य करत नाहीत. याची अनेक कारणे असू शकतात.
जागतिक पातळीवरील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतातून 5,000 हून अधिक प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनी प्रति ग्राहक 99 डॉलर किंवा 7,350 रुपये आकारत आहे, आणि बीटा टप्प्यात प्रति सेकंद 50 ते 150 मेगाबिट डेटा स्पीड ऑफर करण्याचा दावा करते. त्यामुळे आता भारतामध्ये टेलिकॉम कंपन्यांमध्ये अधिक स्पर्धा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.