इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय मिळवत सलग तिसरा सामना जिंकला. न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी २५० धावांचं आव्हान दिले होते. पण, भारतीय संघाच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडला ४५.३ ओव्हरमध्ये फक्त २०५ धावाच करता आल्या. या सामन्याच मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती पदार्पणातच ५ विकेट घेऊन हिरो ठरला. या विजयामुळे भारतीय संघाने आपल्या गटात पहिले स्थान मिळवले. या सामन्यामुळे उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारताचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी तर न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेश होणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी करतांना ५० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून २४९ धावा केल्या. त्यात श्रेयस अय्यर याने सर्वाधिक ७९ धावा केल्या. अक्षर पटेल याने ४२ तर हार्दिक पंड्याने ४५ धावांची निर्णायक खेळी केली. तर न्यूझीलंडकडून केन विलियमसन याने सर्वाधिक ८१ धावा केल्या. मात्र केन व्यतिरिक्त एकालाही टीम इंडियाच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. केनचा अपवाद वगळता इतर कुणालाही ३० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. कॅप्टन मिचेल सँटनर याने २८ तर विल यंग याने २२ धावा केल्या. तर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना २० धावांच्या आत रोखत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
भारतीय संघाने गोलंदाजी करतांना मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती १० ओव्हरमध्ये ४२ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स घेतल्या. त्याचा एकदिवसीय कारकीर्दीतील चॅम्पियन्स ट्रॉफीतील हा पहिलाच सामना होता. तसेच कुलदीप यादव याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने प्रत्येकी १-१ विकेट घेत चांगली साथ दिली.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड संघ – मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरुर्के.