इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करत सुपर ४ फेरीतील सलग दुसरा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली आहे.
भारतयी संघाने या स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळवला आहे. बुधवारी रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ४१ धावांनी शानदार विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीयच्या क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बांगलादेशसमोर १६९ धावांचे आव्हान भारतीय संघाने ठेवले. पण, भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशला पूर्ण २० ओव्हरही खेळता आले नाही. बांगलादेशने १९.३ ओव्हरमध्ये १२७ रन केले.
या सामन्यात भारतीय संघातील कुलदीप यादव याने सर्वाधिक ३ विकेट्स मिळवल्या. वरुण चक्रवर्ती याने दोन तर अक्षर पटेल आणि तिलक वर्मा या दोघांनी १-१ विकेट मिळवली. भारतीय संघाने फलंदाजी करतांना चोख कामगिरी केली. अभिषेक शर्मा याने सर्वाधिक ७५ धावांचं योगदान दिलं. अभिषेकने या खेळीत ५ सिक्स आणि ६ फोर लगावले. अभिषेक व्यतिरिक्त टीम इंडियासाठी हार्दिक पंड्या याने ३८ धावा जोडल्या. शुबमन गिल याने २९ धावांचं योगदान दिलं. तर अक्षर पटेल याने नाबाद १० धावा केल्या. मात्र शिवम दुबे आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या तिघांनी निराशा केली. २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून १६८ धावांपर्यंत मजल मारत बांगलादेशला १६९ धावांचे आव्हान दिले.
बांगलादेशसाठी रिशाद होसैन याने दोघांना आऊट केलं. तर तंझीम साकिब, मुस्तफिजूर आणि सैफुद्दीन या तिघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली. तर फलंदाजीत बांगलादेशकडून ओपनर सैफ हसनैन याने सर्वाधिक ६९ रन्स केले. तर परवेझ एमोनने २१ धावांचं योगदान दिले. तर इतरांना ७ धावांच्या पुढे जाता आले नाही.