मुंबई – भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने संघाच्या कर्णधारपदासाठी आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याची निवड केली आहे. एकदिवसीय आणि टी२० सामन्यांसाठी रोहित हा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे सध्याचा कर्मधार विराट कोहलीला बीसीसीआयने झटका दिला आहे. भारतीय संघ टी२० विश्वचषकात पहिल्याच फेरीत बाद झाला. तसेच, विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी करीत नसल्यानेच बीसीसीआयने नेतृत्व बदलले आहे.
अफ्रिका दौऱ्यासाठी संघ असा
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
अधिकचे खेळाडू – नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जान नागव्सल्ला
https://twitter.com/BCCI/status/1468577752953483264?s=20
असे रंगतील सामने
कसोटी सामने
पहिली कसोटी – 26 ते 30 डिसेंबर 2021 – सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन
दुसरी कसोटी – 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2022 – न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी – 11 ते 15 जानेवारी – न्यू लँड्स, केपटाऊन
एकदिवसीय सामने
पहिला सामना – 19 जानेवारी – बोलंड पार्क, पार्ल
दुसरा सामना – 21 जानेवारी – बोलंड पार्क, पार्ल
तिसरा सामना – 23 जानेवारी – न्यू लँड्स, केपटाऊन