नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी २.४० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी महसूल संकलनाची नोंद केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ सुमारे ४९००० कोटी रुपयांनी अधिक आहे, जी २५ टक्के वाढ दर्शवते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात माल वाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ होत तो १.६२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ अंदाजे १५ टक्के आहे.
भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतुक महसुलात देखील आतापर्यंतची सर्वाधिक ६१ टक्के वाढ झाली असून ती ६३३०० कोटी रुपये झाली. भारतीय रेल्वे तीन वर्षांच्या कालखंडानंतर निवृत्ती वेतनासाठीचा खर्च पूर्णपणे करण्यास सक्षम झाली आहे. भारतीय रेल्वे नेहमीच सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. राष्ट्रीय रेल संरक्षा कोष अंतर्गत विविध सुरक्षा कामांसाठी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ११,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
https://t.co/hXxdyOqjWs
? बिनधास्त बोला*राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजप सोबत जाणार का?*
आपले स्पष्ट मत येथे मांडा
?https://t.co/rSK0l7dmqK— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 18, 2023
? कोहली-गांगुली वाद कायम!
*त्या घटनेनंतर विराटने गांगुलीला केले अनफॉलो*
https://t.co/etSckwoNzS#indiadarpanlive #cricket #virat #kohli #sourav #ganguly #unfollow— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 18, 2023
Indian Railway Revenue 2022-23 Goods Passenger Service