नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे मंत्रालयाने यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी विचारविनिमय करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेत (आयआरएमएस) केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विशेष प्रकारे तयार केलेल्या(आयआरएमएसई) परीक्षेद्वारे २०२३ पासून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयआरएमएसई ही दोन टप्प्यामधील परीक्षा असेल. त्यामध्ये प्राथमिक चाचणी परीक्षा आणि त्यानंतर मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असेल.परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच आयआरएमएस(मुख्य) लेखी परीक्षेसाठी योग्य प्रमाणात उमेदवार निवडण्यासाठी, सर्व पात्र उमेदवारांना नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा द्यावी लागेल आणि त्यामधून योग्य संख्येमध्ये आयआरएमएस(मुख्य) परीक्षेसाठी उमेदवारांची निवड होईल. आयआरएमएस( मुख्य) परीक्षेमध्ये खालील विषयातील नेहमीच्या निबंध स्वरुपातील चार पेपर्सचा समावेश असेल.
i.पात्रता परीक्षेचे पेपर
पेपर ए- राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या
भारतीय भाषांपैकी एका भाषेची निवड उमेदवाराला करावी लागेल – ३०० गुण
पेपर बी-
इंग्रजी ३०० गुण
ii.गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणारे पेपर
पर्यायी विषय पेपर १ – २५० गुण
पर्यायी विषय पेपर २ – २५० गुण
iii.व्यक्तिमत्व चाचणी – १०० गुण
पर्यायी विषयांची यादी ज्यामधून उमेदवाराला केवळ एका विषयाची निवड करता येईल.
i.सिव्हिल इंजिनिअरिंग,
ii.मेकॅनिकल इंजिनिअरिंग,
iii.इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
iv.कॉमर्स अँड अकाउंटन्सी.
पात्रता परीक्षेसाठी वर उल्लेख केलेल्या पेपर्ससाठी आणि पर्यायी विषयांसाठीचा अभ्यासक्रम नागरी सेवा परीक्षेसारखाच(सीएसई) असेल. नागरी सेवा(मुख्य) परीक्षा आणि आयआरएमएस(मुख्य) परीक्षांचे सामाईक उमेदवार वर उल्लेख केलेल्या पर्यायी विषयांपैकी कोणत्याही विषयाची निवड या दोन्ही परीक्षांसाठी करू शकतात किंवा प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळे विषय (सीएसई(मुख्य) परीक्षेसाठी एक आणि आयआरएमएसई(मुख्य) परीक्षेसाठी एक) या परीक्षांच्या योजनांनुरुप निवडू शकतात.
पात्रता परीक्षेचे पेपर आणि पर्यायी विषयांच्या( प्रश्नपत्रिका आणि उत्तरे लिहिण्यासाठी) भाषेचे माध्यम आणि स्क्रिप्ट सीएसई(मुख्य) परीक्षेप्रमाणेच असेल. या परीक्षेसाठी विविध श्रेणींसाठीची वयोमर्यादा आणि प्रयत्नांची संख्या सीएसई प्रमाणेच असेल.
किमान शैक्षणिक अर्हता – अभियांत्रिकी पदवी / वाणीज्य शाखेची पदवी/ भारतामधील केंद्र सरकार किंवा राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार किंवा संसदेच्या कायद्याने स्थापन झालेल्या विद्यापीठाकडून किंवा इतर शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठ अनुदान आयोग कायदा १९५६ च्या तिसऱ्या कलमानुसार अभिमत विद्यापीठ म्हणून जाहीर झालेल्या विद्यापीठाकडून अभियांत्रिकीमध्ये पदवी/ वाणिज्य शाखेतली पदवी /चार्टर्ड अकौटन्सी. आयआरएमएसईसाठी (१५०) यूपीएससीशी समझोता करण्यात येत आहे ज्यामध्ये चार पर्यायांपैकी खालील जागा असतील; सिव्हिल (३०) मेकॅनिकल (३०) इलेक्ट्रिकल (६०) आणि कॉमर्स अँड अकाउंटन्सी (३०).
निकालांची घोषणा – या चार शाखांमधील गुणवत्तेच्या आधारावर अंतिम शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची एक यादी यूपीएससी तयार करेल आणि जाहीर करेल. प्रस्तावित परीक्षेमध्ये आयआरएमएस(मुख्य) परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी नागरी सेवा (पी) परीक्षेचा समावेश असल्याने आणि त्यानंतरही भाषेचे सामाईक पात्रता पेपर आणि सीएसई आणि आयआरएमएसईसाठी काही पर्यायी विषयांचे पेपर असल्याने या दोन्ही परीक्षांचे प्राथमिक भाग आणि मुख्य लेखी भाग एकाच वेळी आयोजित करण्यात येतील. सीएसई सोबतच आयआरएमएसईची अधिसूचना जाहीर केली जाईल.
२०२३ च्या यूपीएससी परीक्षांच्या वार्षिक कार्यक्रमानुसार नागरी सेवा(पी) परीक्षा-२०२३ ची अधिसूचनेची घोषणा आणि आयोजन अनुक्रमे १-२-२०२३ रोजी आणि २८-५-२०२३ रोजी होईल. सीएसपी परीक्षा-२०२३ चा उपयोग आयआरएमएस(मुख्य) परीक्षेतील उमेदवार निवडण्यासाठी देखील होणार असल्याने आयआरएमएस-२०२३ परीक्षेसाठी देखील याच वेळापत्रकाला अनुसरून अधिसूचित केले जाईल.