विषेष प्रतिनिधी, मुंबई
भारतीय रेल्वेअंतर्गत येणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर कॉर्पोरेशन आफ इंडिया या कंपनीने ज्युनियर मॅनेजर आणि एक्झीक्युटिव्हसह विविध पदांसाठी भरती करण्याचे घोषित केले आहे. एकूण रिक्त पदांची संख्या १०७६ आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख २३ मे आहे. अर्थात अद्याप लेखी परीक्षेची घोषणा झालेली नाही.
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, आपरेशन्स अँड बिडी यात ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदावर अर्ज करणाऱ्या अभ्यासकांकडे दहावी आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे. कार्यकारी पदावर अर्ज करणाऱ्यांकडे तीन वर्षांची पदविका असणे अनिवार्य आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत रेल्वे इंडिया तंत्रज्ञान आणि आर्थिक सेवा विभागातर्फे अप्रेंटिसशिपसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांवर अर्ज करण्यासाठी २२ एप्रिलपासून प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जासाठी अंतिम तारीख १२ मे आहे. एकूण रिक्त पदांची संख्या १४६ आहे. मान्यता प्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी अर्ज करणाऱ्याकडे हवी. इतरांना बीए, बीबीए, बीकॉम यापैकी एक पदवी अनिवार्य करण्यात आली आहे. अभियांत्रिकीची पदविका किंवा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा रिक्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
रिक्त पदांसाठी १७ मेपर्यंत अर्ज करा
पंजाब स्टेट ट्रान्समिशन कॉर्पोरेशन या कंपनीत विविध पदांसाठी जागा निघालेल्या आहेत. एकूण रिक्त पदांची संख्या ४९० आहे. अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी १७ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदांसाठी १८ ते ३७ वर्ष वयोगटातील तरुणच अर्ज करू शकणार आहेत.