नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेने स्वतःची खानपान शाखा म्हणजेच भारतीय रेल्वे पर्यटन आणि केटरिंग कॉर्पोरेशन (IRCTC) उघडण्याच्या निर्णय घेतला होता. परंतु आता या निर्णयामुळे रेल्वे विभागाला फायदा होण्याची मोठे नुकसान तथा तोटा सहन करावा लागला आहे, असे सांगण्यात येते.
या संदर्भात भारतीय रेल्वेने एक स्पष्टीकरण जारी केले आहे. रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, COVID-19 मुळे, फूड प्लाझाच्या कामामध्ये मोठी कपात झाली आहे असून ओपन टेंडरिंग ही एक सतत प्रक्रिया आहे. ज्याद्वारे फूड प्लाझांना सवलत दिले जाते. मात्र अयोग्य वापर आणि आर्थिक व्यवहार्यतेचा अभाव यामुळे रेल्वेला तोटा सहन करावा लागत आहे.
इंडियन रेल्वे टुरिझम अँड केटरिंग कॉर्पोरेशन (IRCTC) ही संस्था ट्रेन्स आणि त्याच्या स्टेशनरी युनिट्समध्ये अन्न पुरवण्यासाठी जबाबदार आहे. मुख्यत्वे रेल्वेपासून नॉन-रेल्वे ऑपरेशन्स वेगळे करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती, अशा युनिट्स म्हणजे फूड प्लाझा, फास्ट फूड युनिट्स आणि मल्टी रेस्टॉरंट्स स्थापन करण्यात IRCTC अयशस्वी झाल्यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूलाचे नुकसान झाले आहे.
आता त्याची जबाबदारी विभागीय रेल्वेकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 17 क्षेत्रीय रेल्वेंना अशा युनिट्ससाठी स्थानकांवर रिक्त झालेल्या जागा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेल्या रिकाम्या किंवा अवापर केलेल्या जागेवर विभागीय रेल्वेद्वारे नवीन फूड प्लाझा, फास्ट फूड युनिट्स, मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट्सची स्थापना केली जात आहे, असे आदेशात म्हटले आहे.
यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे की, आयआरसीटीसीला दिलेल्या अनेक जागा रिकाम्या राहिल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना सेवा न मिळणे आणि रेल्वेचा महसूल बुडाला हे लक्षात घेऊन, विभागीय रेल्वेला प्रमुख युनिट्सना नवीन नियोजनाचे निर्देश देण्यास सांगितले जाऊ शकते.