इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव जवळपास अंतिम असल्याचे मानले जात आहे. मात्र, त्यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डेंट कमी खासदारांचा पाठिंबा असूनही हार मानायला तयार नाही. आजच ऋषी सुनक यांच्या राज्याभिषेकाची घोषणा होण्याची शक्यता आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ते पोर्तुगाल पर्यंत, भारतीय वंशाचे राजकारणी सध्या जगभरातील देशांमध्ये महत्त्वाच्या विभागात सेवा देत आहेत. ऋषी सुनक यांचेही नाव या यादीत सामील होणार आहे. आता जाणून घेऊया त्या नेत्यांबद्दल…
ब्रिटनच्या इतिहासात भारतीय वंशाची व्यक्ती नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ असेल. या राज्याभिषेकामुळे सुनक जगातील बलाढ्य देशांमध्ये सत्ता गाजवणाऱ्या निवडक भारतीय दिग्गजांमध्ये सामील होईल. सुनक यांच्या आधी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचाही जगातील सर्वोच्च नेत्यांमध्ये समावेश आहे. हॅरिस व्यतिरिक्त इतर दोन नेते आहेत ज्यांचा जगभरात डंका आहे.
कमला हॅरिस
कमला हॅरिस या सध्या जो बिडेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अमेरिकेच्या क्रमांक दोनच्या नेत्या आहेत. त्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला उपाध्यक्ष बनल्या आहेत. कमला हॅरिस या मूळच्या तामिळनाडूच्या असून त्यांनी यापूर्वी २०११ ते २०१७ पर्यंत कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल म्हणून काम पाहिले होते.
प्रविंद जगन्नाथ
प्रविद जगन्नाथ हे जगातील महान नेत्यांपैकी एक आहेत. प्रविद सध्या मॉरिशसचे पंतप्रधान आहेत. मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची पदे भूषविल्यानंतर प्रविंद कुमार जगन्नाथ यांची मॉरिशसच्या पंतप्रधानपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांचा जन्म ला कॅव्हर्न येथे एका भारतीय कुटुंबात झाला.
अँटोनियो कोस्टा
अँटोनियो कोस्टा पोर्तुगालचे सध्याचे पंतप्रधान आहेत. २०२२ मध्ये विजयानंतर त्यांची तिसरी टर्म हाताळत आहेत. पोर्तुगालशिवाय अँटोनियाचाही संबंध गोव्याशी आहेत.
Indian Origin Persons Leader Global Status