इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरातील सोशल मीडिया प्रेमींना भुरळ घालणाऱ्या यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. नील मोहन हे २०१५ पासून यूट्यूबमध्ये उत्पादन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जगावरील भारताचा वरचष्मा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
कोट्यवधी मोबाईलधारक यूट्यूबचे चहाते आहेत. भारतीयही यूट्यूबवर अक्षरशः उड्या टाकत आहेत. यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार सुसान व्होजिकी या पदावरून पायउतार झाल्या आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
व्होजिकी यांचा राजीनामा
सुसान व्होजिकी गुगलच्या जाहिरात विभागात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्यांची २०१४ साली यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली होती. कौटुंबिक, आरोग्यसंदर्भातील कारणे आणि वैयक्तिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी यूट्यूबचा राजीनामा देत असल्याचा सुसान व्होजिकी यांनी सांगितले.
कोण आहेत नील मोहन?
नील मोहन यांनी २००८ साली गुगलमधून आपल्या कामाला सुरुवात केली होती. २०१५ साली ते यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून रुजू झाले. नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी १५ वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आता यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार पदी नील मोहन यांनी नियुक्ती झाली आहे. दरम्यान, सुसान व्होजिकी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अल्फाबेट इंकच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांची पडले.
YouTube के नए CEO बने नील मोहन ??#NealMohan pic.twitter.com/EYEMmUPfoO
— Ajay Sehrawat (मोदी का परिवार) (@IamAjaySehrawat) February 17, 2023
Indian Origin Neal Mohan is now YouTube CEO