मुंबई – जगभरातील अनेक नामांकीत कंपन्यांच्या उच्च पदावर मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या महिलांनी वर्चस्व निर्माण केले आहे. यात आता आणखी एका महिलेची भर पडली आहे. विशेष म्हणजे ही महिला मुंबई मध्ये जन्मलेली आहे. तिचे नाव आम्रपाली गुन असे आहे. त्या आता अॅडल्ट वेबसाईटच्या सीईओ बनल्या आहेत.
मुंबईत जन्म
आम्रपाली गुन (वय ३६) यांची सबस्क्रिप्शन-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनीच्या सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अॅडल्ट कंटेंट क्रिएशन प्लॅटफॉर्म कंपनीचे संस्थापक सीईओ टिम स्टोकली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम्रपाली गुन या मागील 2 वर्षांपासून ओनली फॅन्स कंपनीशी संबंधित आहे. आम्रपाली गुन यांचा जन्म मुंबईत झाला आहे. सध्या त्या कॅलिफोर्नियामध्ये राहत आहेत. आम्रपाली यांनी FIDM मधून मर्चेंडाईज मार्केटिंग आर्ट्समध्ये पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली. हार्वर्ड बिझनेस स्कूल ऑनलाइन मधूनही त्यांनी उद्योजकतेची पदवी घेतली आहे.
आम्रपाली यांनी २००७ मध्ये पेप्सिकोसह मार्केटिंग विभागाचे नेतृत्व केले आहे. आम्रपाली गुनने तिच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. आम्रपालीने २०२० मध्ये ओनली फॅन्स सोबत काम करण्यास सुरुवात केली. आम्रपाली सोशल मीडियावरही सक्रिय असतात. आम्रपाली गुन यांचे सोशल मीडियावरील अकांऊट ही बरेच जुने आहे. जिथे ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करते. जिथे ती अनेकदा तिच्या कुत्र्याचे फोटो, तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि इतर वैयक्तिक कार्यक्रम शेअर करत असते.