नवी दिल्ली – बुद्धीबळ या खेळात भारतीय खेळाडूनीं विशेष प्रावीण्य मिळवत अनेक जागतिक विक्रम केले आहे. त्यातच आता भारतीय वंशाचा १२ वर्षीय अमेरिकन बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा हा जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला आहे.
मूळचा भारतीय वंशाचा आणि सध्या अमेरिकेतील न्यू जर्सी येथील रहीवासी अभिमन्यू हा १२ वर्षे, ४ महिने, २५ दिवसांचा असून त्याने यापुर्वीचा विक्रमवीर रशियाच्या सर्गेई करजाकिन याचा २००२ मधील सुमारे १९ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला. तो खेळाडू तेव्हा १२ वर्षे, ७ महिने वयाचा होता. तर आता बुधवारी बुडापेस्टमध्ये भारताच्या ग्रँडमास्टर लिओनचा पराभव करून अभिमन्यूने हे कामगिरी केली.
काळ्या तुकड्यांसह खेळत त्याने ल्योनला पराभूत केले आणि २६०० रेटिंग गुण मिळवले. नोव्हेंबर २०१९ मध्ये, अभिमन्यू (१० वर्षे, ९ महिने, ३ दिवस) जगातील सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला. त्यानंतर त्याने आर. प्रानानंदचा (१० वर्षे, ९ महिने, २० दिवस) विक्रम मोडला.










