पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची व महत्वाची माहिती आहे. भारतीय नौदल विविध पदावरील 1500 हून अधिक पदे भरण्यासाठी भरती मोहीम राबवत आहे. भारतीय नौदलात भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च (तात्पुरती) आहे. भारतीय नौदलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीद्वारे ट्रेड्समनच्या 1531 पदांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 679 जागा, ईडब्ल्यूएससाठी 141 जागा, ओबीसीसाठी 385 जागा, एससीसाठी 215 जागा आणि एसटी प्रवर्गासाठी 93 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 18 मार्चपासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत.
तसेच अधिक तपशिलांसाठी उमेदवारांना सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. तसेच उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असावा. त्याला इंग्रजीचे ज्ञान असले पाहिजे. याशिवाय संबंधित ट्रेडमधील अप्रेंटिस प्रशिक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत दोन वर्षांच्या नियमित सेवेसह मेकॅनिक किंवा इतर समकक्ष पदावर काम केलेले आहे. भारतीय नौदलात भरती करिता वयोमर्यादा, उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. तथापि, राखीव प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. तसेच निवडलेल्या उमेदवाराला वेतनश्रेणी स्तर-2 नुसार 19,900 रुपये ते 63,200 रुपये पगार मिळेल. इंडियन नेव्ही ट्रेडसमन रिक्रूटमेंट 2022 बद्दल अधिक माहितीसाठी joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी उमेदवार येथे क्लिक करावे, असे कळविण्यात आले आहे.