विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतीय नौदलामध्ये जम्बो भरती होत आहे. नौदलात तब्बल अडीच हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी २६ एप्रिलपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जदारांनी १२वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र/संगणक विज्ञान हे विषय अभ्यासलेले असावे. अर्ज करण्यासाठी नेव्हीच्या https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.