इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लॉस वेगासमध्ये 64 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संगीतकार रिकी केज आणि त्यांचे सहकारी स्टीवर्ट कोपलँड यांना सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बमच्या श्रेणीतील हा प्रतिष्ठित संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या जागतिक स्तरावरील पुरस्काराने भारतीय संगीत क्षेत्रात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
रिकी आणि स्टीवर्ट यांना त्यांच्या ‘डिव्हाईन टाइड्स’ अल्बमसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. हा त्याचा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे. याआधी सन 2015 मध्ये त्याच्या ‘विंड्स ऑफ संसारा’ या अल्बमसाठी त्याला याच श्रेणीत पुरस्कार मिळाला होता. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकीचे अभिनंदन केले. पीएम मोदींनी याबद्दल एक ट्विट केले आणि रिकीला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रिकीने पुरस्कारानंतरचा फोटो शेअर : एक फोटो शेअर करत रिकीने लिहिले, ‘आमच्या डिव्हाईन टाइड्स अल्बमसाठी आज ग्रॅमी अवॉर्ड जिंकला. कृतज्ञता आणि प्रेमाने मी स्टीवर्ट कोपलँडसोबत उभा आहे. हा माझा दुसरा ग्रॅमी आणि स्टीवर्टचा सहावा पुरस्कार आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1510955991915184135?s=20&t=d0ljKT74yLwPgSrS6SVvqQ
रिकीच्या या ट्विटवर पंतप्रधानांनी लिहिले – ‘या यशाबद्दल अभिनंदन आणि तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा.’ दरम्यान, यापूर्वी सन 2015 मध्ये जेव्हा रिकीला ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता, तेव्हा पीएम मोदींनी रिकीची त्यांच्या दिल्लीतील ऑफिसमध्ये भेट घेतली होती. त्याने त्याच्या फेसबुक पेजवर रिकीसोबतचा एक फोटोही पोस्ट केला होता आणि त्याला कॅप्शन दिले होते – ‘ग्रॅमी अवॉर्ड विजेत्या रिकी केजसोबत मीटिंग.’