इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय संस्कृतीचे चाहते जगभरात आहेत. भारतात कितीही विविधता असली आणि भारतीय कितीही मॉडर्न झाले तरी त्यालाही भारतीय संस्कृतीचा म्हणून एक खास टच असतोच. म्हणूनच भारतात रहायला यायला अनेकजण उत्सुक असतात. अनेक परदेशी नागरिक इथे येऊन स्थायिक होतात. काही परदेशी मुली तर लग्न करूनच इथे कायमस्वरूपी राहायला येतात आणि इथेच रमतात.
कोणतीही गोष्ट प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. अशीच एक सासू – सुनेची गोष्ट सध्या तुफान व्हायरल होते आहे. यात जर्मनीची एक सून भारतातील एका गावात कांदा पेरते आहे. हा व्हिडीओ तसा जुना आहे पण तो पुन्हा व्हायरल होतोय. खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही परदेशी सून देशी स्टाइलमध्ये शेती करते आहे.
ही परदेशी महिला पंजाबी ड्रेस घालून शेतात उतरलेली दिसते. तिने सिंदूर सुद्धा लावलेला आहे. शेतात आरामात बसून ती कांदा पेरत आहे. एका परदेशी महिलेला शेतात काम करताना पाहून एक माणूस व्हिडिओ बनवू लागतो आणि तिच्यासोबत गप्पा मारायला लागतो. व्हिडिओ बनवणारी व्यक्ती बहुधा या मुलीच्या सासरकडची असावी. या दोघांच्या गप्पा देखील रंजक आहेत. तो माणूस तिला ‘तू कुठून आली आहेस’ असे विचारतो, त्यावर ती ‘मी जर्मनीची आहे आणि आता इथल्या शेतात कांदा लागवड करतीये” असं ती सांगते.
‘जर्मनीहून तुम्ही भारतात कांदा लावण्यासाठी आला आहात का’, असा गमतीशीर प्रश्न तो तिला विचारतो. त्यावर ती महिला हसायला लागते. या सगळ्यात दूर उभ्या असलेल्या परदेशी सुनेची सासू हसत-खेळतांना दिसते. महिलेच्या सासूबाईंची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि ते आपला फीडबॅकही देत आहेत.
Indian Mother in Law German Daughter in Law Onion Farm Video Viral