नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ते पूर्णपणे रोखण्यासाठी देशभरात एक राष्ट्रीय कायदा असावा. असा गुन्हा अजामीनपात्र करून दोषींना १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असावी, यासाठी सर्व डॉक्टर एकजूट होऊन प्रयत्न करणार, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे(आयएमए ) राष्ट्रीय अध्यक्ष सहजानंद प्रसादसिंग यांनी केले. आयएमए नाशिक शाखेच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा शालिमार येथील आयएमएच्या डॉ. जोशी सभागृहात झाला त्यावेळी सहजानंद प्रसादसिंग बोलत होते.
डॉ. राजश्री पाटील या इंडियन मेडीकल असोसिएशनच्या ६४ व्या महिला अध्यक्षा असून नाशिकच्या ४ थ्या महिला अध्यक्षा असल्याचेही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. व्यासपीठावर आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, जागतिक आरोग्य संघटनेनचे खजिनदार डॉ. रविंद वानखेडकर, नाशिक शाखेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, सचिव डॉ. विशाल पवार, आयएमएचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. दिनेश कुमार, डॉ. सुनिल कुमार उपस्थित होते. आयएमए नाशिकचे मावळते अध्यक्ष डॉ हेमंत सोनानिस यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. डॉ. कविता गाडेकर यांनी डॉ. पवार यांच्याकडे सचिवपदाची सूत्रे बहाल केली.
यावेळी डॉ. सहजानंद यांनी आयएमए डॉक्टरांसाठी राष्ट्रीय स्तरावरील नव्या पुरस्काराची लवकर घोषणा करणार असल्याची माहिती दिली. मिक्स पॅथीसाठी वैद्यकीय सेवा करता येणार किंवा कसे याबद्दल नुकतीच एक समितीची स्थापना केली असल्याचे सांगुन त्याचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांना संमिश्र पॅथीद्वारे प्रॅक्टिस करता येण्याबद्दल चित्र दिसेल डॉ. प्रसादसिंग यांनी नमूद केले. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पाटील म्हणाल्या, कोणत्याही कारणाने डॉक्टरांवर हल्ले करण्याचे प्रकार मुळीच सहन करून घेतले जाणार नाही. अशा हल्ल्याबाबत अधिक कडकपणे आणि जोरकसपणे काम करणार असलयाचे त्यांनी सांगितले.
मावळते अध्यक्ष डॉ. सोननिस भाषणात म्हणाले, माझ्या अध्यक्षपणाचा काम कोविड मुळे प्रचंड आव्हानात्मक राहिला, ते स्वीकारत संघटनेसाठी काम करणे मला समाधन देऊन गेले. कोविड काळात कोरोना योद्धे म्हणून केवळ डॉक्टरांच नव्हे तर वैद्यकीय सेवेतील ज्यां कुणाचा या काळात हातभार लागला त्यासर्वांचा आयएमए नाशिक शाखेतर्फे योद्धे म्हणून गौरव केला. प्रारंभी मान्यवारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. भूषण देवरे यांनी गणेश वंदना सादर केली. सूत्र संचलन डॉ. विक्रांती मोरे, डॉ. निलेश जेजुरकर यांनी केले. डॉ विशाल पवार यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. पंकज भट, डॉ. शलाखा बागुल, डॉ. सागर भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले.
नुतन कार्यकारिणी याप्रमाणे
अध्यक्षा : डॉ. राजश्री पाटील, सचिव डॉ. विशाल पवार, उपाध्यक्ष डॉ. गितांजली गोंदकर, डॉ. किरण शिंदे, खजिनदार : डॉ. माधवी गोरे-मुठाळ, नियोजित अध्यक्ष : डॉ. विशाल गुंजाळ, सहसचिव : डॉ. मनिषा जगताप, डॉ. सागर भालेराव, वुमन्स विंग चेअरपर्सन : डॉ. शलाका बागुल, को चेअरपर्सन : डॉ. प्रेरणा शिंदे
कार्यकारिणी सदस्य
डॉ. गिरीष औताडे, डॉ. अनिता भामरे, डॉ. मिलिंद भराडीया, डॉ. दिनेश भारंबे, डॉ. पंकज भट, डॉ. भुषण देवरे, डॉ. अस्मिता ढोकरे, डॉ. श्रीया कुलकर्णी, डॉ. सुलभा पवार, डॉ. मिनल रणदिवे, डॉ. सुनिता संगलेचा, डॉ. अजित तिदमे, डॉ. नितीन वाघचौरे