विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. निमित्त आहे ते योगगुरु रामदेव बाबा यांचे. आयएमएने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रामदेव बाबा यांनी कोरोना लसीकरणाबाबत नुकतेच मोठे विधान केले आहे. त्यात बाबा रामदेव म्हणतात की, ‘कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दहा हजार डॉक्टर आणि लाखो नागरिक हे मृत्यूमुखी पडले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करायला हवा.’ सद्यस्थितीत कोरोनाचे मोठे संकट देशात सुरू आहे. अद्यापहू प्रादुर्भाव थांबलेला नाही. डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचारी हे जीवापाड कष्ट करुन रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा स्थितीत या सर्वांच्या कर्तव्यावर अशा प्रकारे रामदेव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. याची दखल देशाचे प्रमुख या नात्याने आपण घ्यावी. आयएमए ही अत्यंत प्रतिष्ठीत आणि व्यावसायिक संघटना आहे. बाबा रामदेव यांच्याकडून लसीकरणाबाबत सुरू असलेल्या अपप्रचाराची आपण दखल घ्यावी. पतंजली सारख्या उत्पादनांचे ते प्रमुख आहेत. आपल्या उत्पादनांसाठी ते प्रचलित आणि शास्त्रीय उपचारांना नाव ठेवत आहेत. याची दखल घेऊन आपण ती योग्य ती कारवाई त्यांच्यावर करावी, अशी मागणी आयएमएने केली आहे.
हे पत्र असे