नाशिक – इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नाशिकमधील इतर सर्व वैद्यकीय संघटनांतर्फे जनहितार्थ एक माहितीपर रेमडेसिवीर बाबत खुलासा प्रसिध्द करण्यात आला. त्यामुळे कोरोनाबाधीत झालेल्या रुग्णांच्या मनातील काही प्रश्नांबाबत माहिती मिळेल…
……
इंडियन मेडिकल असोसिएशन
महाराष्ट्र राज्य covid टास्क फोर्स सदस्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत इंजेक्शन रेमडेसीविरच्या गंभीर स्वरूपाच्या तुटवड्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे.
1. हे इंजेक्शन life saving म्हणजेच कोविड बाधित रुग्णाचे जीव वाचविणारे रामबाण Anti Viral/ प्रति विषाणू औषध आहे असा जनमानसात असलेला गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.
2. ह्या गैरसमजामुळे पेशंट्स, नातेवाईक, ट्रीटमेंट करणारे डॉक्टर सर्वांवरच दबाव येत आहे.
टास्क फोर्स च्या निर्देशांच्या आधारे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नाशिक मधील समस्त वैद्यकीय संघटना सगळ्यांना सांगू इच्छिता की:-
१. हे Life Saving औषध नाही.
२. आजाराच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे २ ते ९ दिवसांत दिलं गेलं तरच त्याचा उपयोग होतो नंतर नाही.
३. योग्य वेळी दिल्यास ह्या इंजेक्शनमुळे पेशंटला हॉस्पिटलमध्ये केवळ दोन दिवस कमी रहावं लागतं.
४. ह्या इंजेक्शन मुळे व्हायरस/विषाणू रोग्याच्या शरीरात वाढण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे हॉस्पिटल स्टे आणि नंतर प्रकृती सुधारण्यासाठी २ दिवस कमी लागतात.
५. ह्या इंजेक्शनशिवायही पेशंटला वाचवता येतं.
6.होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या पेशंटला हे इंजेक्शन देता येणार नाही.
7. टास्क फोर्स इंजेक्शन रेमदडेसीविरच्या अवाजवी, बेकायदेशीर वापराचा आणि साठेबाजीचा तीव्र विरोध आणि निषेध करते.
8. कोविड बाधित रुग्णाला इंजेक्शन रेमडेसीविर द्यावे की नाही हे पेशंटची ट्रीटमेंट करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांनी ठरवणे श्रेयस्कर राहील हे टास्क फोर्स जाणते आणि केवळ तज्ञ, अनुभवी डॉक्टरांनीच ते ठरवावं असा आग्रहही टास्क फोर्स करते.