मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदाचे पर्जन्यमान कसे असेल याचा खुलासा झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार भारतवासियांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस देशात होणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. सामान्य स्वरुपाच्या या पावसामुळे देशातील शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळणार आहे.
मान्सून हा भारताचा अर्थमंत्री असल्याचे समजले जाते. त्यामुळेच मान्सूनच्या अंदाजाकडे संपूर्ण भारतवासियांचे लक्ष लागून असते. हवामान विभागाकडून एप्रिलमध्ये पहिला अंदाज दिला जातो. त्यानंतर मेच्या अखेरीस एक अंदाज दिला जातो आणि जून महिन्यात अंतिम अंदाज वर्तविला जातो. गेल्या काही वर्षांपासून भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजाने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
भारत मौसम विज्ञान विभाग ने दक्षिण पश्चिम मानसून ऋतु वर्षा के लिए दीर्घावधि पूर्वानुमान जारी किया है । विवरण के लिए https://t.co/QgwxJY022U पर जाएं। @moesgoi @PIB_India @PIBHindi @ndmaindia @DDNewslive @NDRFHQ @airdelhi pic.twitter.com/biTZG6XtaI
— India Meteorological Department (@Indiametdept) April 14, 2022