सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जर तुम्ही नवीन इअरबड्स खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आला आहे. मेड इन इंडिया असलेल्या अम्ब्रेन ब्रँडचा हा इअरबड लॉन्च झाला आहे. त्यात अनेक फिचर्स आहेत. चला त्याच्या किंमती-वैशिष्ट्यांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया…
मोबाइल अॅक्सेसरीजसाठी लोकप्रिय ब्रँड अम्ब्रेनने गेल्या वर्षी ट्रू वायरलेस ऑडियो सेगमेंट मध्ये प्रवेश केला. आतापर्यंत कंपनीने ग्राहकांना परवडणारे 3 हजार रुपयांपेक्षा कमी, २ हजार रुपयांपेक्षा कमी आणि १ हजार रुपयांपेक्षा कमी इअरबड लॉन्च केले आहेत. आता, कंपनीने डॉट्स सिरीज मालिकेतील आणखी एक ट्रूली वायरलेस इअरबड्सची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे, Ambrane Dots Muse. हे इअरबड्स जलद चार्जिंग सपोर्ट, 10mm ड्रायव्हर्स आणि 23 तासांच्या प्लेटाइमसह येतात.
Ambrane Dots Muse TWS ची किंमत 1,999 रुपये आहे आणि Amazon, Flipkart, Tata Cliq आणि भारतातील अनेक रिटेल स्टोअरवर ते उपलब्ध असतील . हे इयरबड्स पांढरा आणि काळा या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतात व त्यांची एक वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळते आहे. ब्रँडच्या बहुतेक उत्पादनांप्रमाणे, हे देखील “मेड इन इंडिया” TWS आहे.
अम्ब्रेन डॉट्स म्युझ ही हाफ इन-इअर स्टाईल डिझाइनसह TWS ची जोडी आहे, याचा अर्थ तुम्हाला बॉक्समध्ये अदलाबदल करण्यायोग्य इअरटिप्स मिळत नाहीत. आतील बाजूस, ब्लूटूथ 5.1 वायरलेस कनेक्टिव्हिटीसह डॉट्स म्युझ ऑडिओसाठी 10 मिमी बूस्टेड ड्राइव्हर्स आहेत.
बॅटरी लाइफच्या बाबतीत, TWS ला केससह एका चार्जवर 23 तासांपर्यंत आणि फक्त बड्ससह आठ तासांपर्यंत रेट केले जाते. टाइप-सी फास्ट चार्जिंगद्वारे चार्ज करता येते. कंपनीचा दावा आहे की, हे इअरबड्स केवळ 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 90 मिनिटांचा प्लेबॅक देतात. ते कॉलिंगसाठी इन-बिल्ट मायक्रोफोनसह देखील येतात. TWS Google सहाय्यक आणि सिरी व्हॉईस असिस्टंटसाठी देखील सपोर्ट करतात. इतर वैशिष्ट्यांमध्ये 10-मीटर वायरलेस रेंज, टच कंट्रोल्स, एलईडी लाईट इंडिकेटर यांचा समावेश आहे. बड्स+ केसचे वजन ७० ग्रॅम आहे.
ऑडिओ ट्यूनिंगसाठी, कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांनी अधिक शक्तिशाली बास अनुभव करण्यासाठी म्यूज TWS ला ट्यून केले आहे. जे वार्म मिड्स आणि क्रिस्टल-क्लियर हाय वाढवते. कंपनीने असेही म्हटले आहे की, पूर्ण पॉवरवर देखील, इअरबड्स कृत्रिमरित्या वाढवलेला बास किंवा डिस्टोर्शन शिवाय संपूर्ण ऑडिओ स्पेक्ट्रम कॅप्चर करतात.