विशेष प्रतिनिधी, पुणे
अनेक भारतीय महापुरुषांचे जगभरातील विविध देशात आजही अत्यंत आदराने नाव घेतले जात आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराज, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचा समावेश आहे. परंतु अलिकडच्या काळात एका भारतीय व्यक्तीला जपानमध्ये चक्क देव मानले जाते. कदाचित ही व्यक्ती भारतीयांना माहिती नसेलही, परंतु जपानी नागरिकांनी या भारतीय न्यायाधीशाचे चक्क मंदिर उभारले आहे. तेथे नित्य पूजा आणि उपासना केली जाते. या महान न्यायाधीशांचे नाव आहे राधाबिनोद पाल.
आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की, या व्यक्तीला जपानमधील लोक केवळ ओळखतच नाही, तर देवाप्रमाणे त्यांची उपासना देखील करतात. एवढेच नाही तर त्यांच्या स्मृतीत जपानमधील यासुकुनी मंदिर आणि क्योटोमधील र्योझेन गोकोकू मंदिरात विशेष स्मारके उभारली गेली आहेत.
तत्कालीन बंगाल प्रांतात २७ जानेवारी १८८६ रोजी जन्मलेल्या राधाबिनोद पाल हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यायाधीश होते. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज व कोलकाता विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते त्याच विद्यापीठात प्राध्यापकही होते. त्यानंतर त्यांची कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ते ब्रिटीशांचे सल्लागारही होते.
दुसर्या महायुद्धानंतर जपानने केलेल्या युद्ध गुन्ह्यांविरूद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर टोकियोमध्ये राधाबिनोद पाल हे भारतीय न्यायाधीश होते. ब्रिटिश सरकारने त्यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून नेमले. विशेष म्हणजे, एकूण ११ न्यायाधीशांपैकी एकमेव न्यायाधीश असे होते की, ज्यांनी सर्व युद्ध गुन्हेगार निर्दोष आहेत, असा निर्णय घेतला होता. या युद्ध कैद्यांमध्ये जपानचे तत्कालिन पंतप्रधान हिडेकी तोजो आणि इतर २० पेक्षा जास्त नेते आणि सैन्य अधिकारी यांचा समावेश होता.
न्यायाधीश पाल यांनी आपल्या निर्णयामध्ये असे लिहिले होते की, कोणत्याही घटनेनंतर कायदे करणे योग्य नाही. म्हणूनच त्यांनी सर्व युद्ध कैद्यांना महायुद्धातील विजयी देशांच्या सक्तीने सोडून देण्याचा निर्णय दिला होता. मात्र, अन्य न्यायाधीशांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. याचकारणामुळे जपानमध्ये अजूनही त्यांना महान व्यक्तीमत्व माणूस त्यांचा आदर केला जातो.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे २००७ मध्ये भारत दौर्यावर आले. तेव्हा त्यांनी कोलकाता येथे राधाबिनोद पाल यांच्या मुलाची भेट घेतली आणि छायाचित्रांची देवाणघेवाण केली. योगायोग असा त्या काळातील युद्ध गुन्हेगारांमध्ये शिन्झो आबे यांचे आजोबा नोबुसुके किशी होते.