गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या भारतीय उद्योजकाने खरेदी केले हे आलिशान हेलिकॉप्टर; एवढी आहे किंमत आणि फिचर्स

by India Darpan
सप्टेंबर 13, 2022 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
FbCCpGNWIAA3ysg

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील एका उद्योजकाने आलिशान हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. या उद्योजकासह हेलिकॉप्टरची किंमत आणि त्यातील फिचर्स याची सध्या मोठी चर्चा होत आहे. हा उद्योजक म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून लुलू ग्रुपचे चेअरमन एमए युसुफ अली हे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठा मॉल उभारण्याचा विक्रम त्यांच्या कंपनीच्या नावावर आहे. हा मॉल केरळमध्ये आहे. लूलू ग्रुपने कोची, बंगलोर आणि तिरुवनंतपुरम नंतर आता लखनौ मध्ये स्वतःचे सुपरमार्ट उघडले आहे. सुपर मार्ट असलेले त्यांचे हे भारतातील चौथे शहर आहे. तसेच लखनौच्या यशानंतर लुलू ग्रुप उत्तर प्रदेशमधील चार शहरांमध्ये मॉल उघडण्याच्या तयारीत आहे.

लुलू ग्रुपचे चेअरमन एमए युसूफ अली यांनी १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. यानंतर लुलू ग्रुप आणि त्याचे चेअरमन पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर H145 Airbus हे अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. H145 हे जगातील सर्वोत्तम हेलिकॉप्टरमध्ये गणले जाते. २४६ किमी प्रतितास वेगाने हे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकते.

विशेष म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक केबिनसोबतच आपत्कालीन परिस्थितीत सर्च लाइट्स आणि कार्गो हुकही देण्यात आले आहेत. H145 एअरबसचा आतील भाग पूर्णपणे सपाट आहे, ज्यामुळे त्याला अधिक बसण्याची जागा मिळते. इतर हेलिकॉप्टरपेक्षा त्यात प्रवास करणे अधिक आरामदायी आहे. यामध्ये २ पायलट्ससह साधारण ८ प्रवासी प्रवास करू शकतात. आवश्यक असल्यास १० लोकांना याद्वारे प्रवास करता येतो.

लुलू ग्रुपचे मालक युसुफ अली यांच्याकडे यापूर्वी व्हीटी-वायएमए हेलिकॉप्टर होते, जे गेल्या वर्षी २०२१ मध्ये क्रॅश झाले होते. यामध्ये एम.ए.युसूफ अली आणि त्यांची पत्नी थोडक्यात बचावले. हे हेलिकॉप्टर केरळमध्ये कोसळले होते. एमए युसूफ अली हे मूळचे केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील आहेत. सध्या ते यूएईचे नागरिक आहेत.

महत्वाचे म्हणजे फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार, युसूफ अली ५ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ३७५०० कोटी रुपये) संपत्तीसह ३८ व्या स्थानावर आहे. लुलू समूहाचा व्यवसाय पश्चिम आशिया, अमेरिका आणि युरोपमधील ४२ देशांमध्ये पसरलेला आहे. या समुहामध्ये ५७ हजारांहून अधिक लोक काम करतात. एमए युसूफ अली हे UAE मध्ये राहणारे सर्वात श्रीमंत भारतीय NRI आहेत.

Indian Industrialist Buy Luxurious Helicopter
Lulu Group Yusuff Ali Airbus H145

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या बहाद्दरानं मागितली चक्क अशी लाच; जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!!

Next Post

राज्य सरकारकडून तातडीने या ११५९ पदांची भरती; मिळेल एवढा पगार

India Darpan

Next Post
mantralya mudra

राज्य सरकारकडून तातडीने या ११५९ पदांची भरती; मिळेल एवढा पगार

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011