मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अत्यंत जुन्या अशा मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाच्या इंडियन हायस्कुल नावने परिचित असलेली शाळा आपले शताब्दी महोत्सवी वर्षा साजरे करीत आहे. या निमित्त माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्यासह मनमाडचे भूमीपुत्र जेष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात अनेक सध्या वरिष्ठ पदावर असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी दशेत असतांना आम्हाला ही आमच्या शिक्षकांनी शिस्त आणि कार्यक्रमांसाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहचल्याचे सुमित्रा महाजन यांनी सांगत शताब्दी महोत्सवा निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बाहेरगावी असणारे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.