मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघामध्ये नजिकच्या काळात एका मोठा महत्त्वपूर्ण बदल पहायला मिळू शकतो. सध्या के. एल. राहुल भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. पण टी 20 क्रिकेट मध्ये के.एल. राहुलला उपकर्णधार पदावरुन हटवले जाण्याची शक्यता आहे. BCCI आणि निवड समितीने आधीच एक नाव शोधून ठेवले असल्याचे सांगण्यात येते. आता हार्दिक पंड्याची टी 20 क्रिकेट मध्ये केएल राहुलच्या जागी कायमस्वरुपी उपकर्णधार म्हणून नियुक्ती होऊ शकते.
के एल राहुल सध्या दुखापतीचा सामना करतोय. आयपीएल नंतर तो एकही मालिका खेळू शकलेला नाही. आधी ग्रोइन इंजरीच्या गंभीर दुखापतीमुळे त्याला शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला जाव लागले. त्यातून सावरल्यानंतर कोरोनाची लागण झाली. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेला मुकला. आता पुन्हा काही जुन्या दुखण्यांनी डोकं वर काढलय. त्यामुळे बीसीसीआयची निवड समिती टी 20 क्रिकेट मध्ये उपकर्णधारपदी हार्दिक पंड्याची कायमस्वरुपी नियुक्ती करु शकते.
हार्दिक पंड्या वडोदरा स्थित किरण मोरे क्रिकेट अकॅडमी मधून क्रिकेटचे धडे घेत असताना, ‘सय्यद मुश्ताक अली चषका’चा सामना हार्दिकने गाजवला. २०१३ साली या चषकामधे त्याने ‘बरोडा क्रिकेट संघाला’ दणदणीत विजय मिळवून दिला. आणि येथूनच खरतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. हार्दिकने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला २०१६ सालापासून सुरुवात केली. २६ जानेवारी २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यात तो झळकला. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१६ रोजी त्याने पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना साली न्यूझीलँड संघाविरुद्ध खेळाला.
इतकेच नव्हे तर इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच (IPL) मध्ये खेळतांना आपल्याला एक वेगळाच हार्दिक अनुभवायला मिळतो. त्याची खेळी सुरु झाली म्हणजे षटकार आणि चौकारांची जणू आतिषबाजीच सुरु होते. एवढंच काय तर गोलंदाजी मध्ये सुद्धा तो मागे नाही. एकंदरीत काय तर हार्दिक पंड्याच्या रूपाने भारतीय संघाला एक उत्कृष्ट आणि निपुण अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे.
आयपीएल 2022 पासून हार्दिक पंड्या जबरदस्त प्रदर्शन करतो असून त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने डेब्यु मध्येच आयपीएलच जेतेपद पटकावलं. या स्पर्धेमधूनच हार्दिक पंड्यामधले नेतृत्वगुण दिसून आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. तिथे त्याने बॅट आणि बॉलने उत्तम प्रदर्शन केले.
आयर्लंड सीरीजसाठी नेतृत्व त्याच्याहाती होतं. तिथेही भारताने मालिका जिंकली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात त्याने उत्तम ऑलराऊंडर खेळाच प्रदर्शन केलं. वेस्ट इंडिज विरुद्धच्या चालू टी 20 मालिकेतही तो सरस खेळ खेळतोय. अवघ्या पाच महिन्यात हार्दिकने क्रिकेटच्या जाणकारांना भविष्यातील कॅप्टन म्हणून त्याची दखल घ्यायला भाग पाडले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत आता मोठा बदल करण्यात आला .या मालिकेत आता लोकेश राहुल खेळणार नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. राहुलच्या जागी भारतीय संघात एका धडाकेबाज फलंदाजाला संधी दिली आहे. राहुलला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो जर्मनीमध्ये उपचार घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर राहुल भारतामध्ये दाखल झाला आणि बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला होता. त्यानंतर राहुलला कोरोना झाल्याने तो विलगीकरणात होता. अखेर राहुल या मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. राहुलच्या जागी आता भारतीय संघात धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला होता.
भारताचा संभाव्य संघ असा
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
Indian Cricket Team T20 Matches Big Changes
BCCI KL Rahul Hardik Pandya Rohit Sharma Captain