इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बांगलादेश विरुद्धची मालिका भारताने गमावली पण तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने अनेक रेकॉर्डस केले आहेत. चितगाव येथे खेळवण्यात आलेला तिसरा आणि शेवटचा सामना भारताने २२७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. एकदिवसीय क्रिकेट इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाचा हा तिसरा सर्वात मोठा विजय होता. मात्र, हा सामना जिंकूनही टीम इंडियाला मालिका १-२ ने गमवावी लागली.
टीम इंडियाने ही मालिका गमावली असेल, पण या सामन्यात इशान किशन आणि विराट कोहलीच्या खेळीने असे अनेक विक्रम केले, ज्यामुळे हा सामना कायमचा संस्मरणीय ठरला आणि इतिहासाच्या पानांमध्ये नोंद झाली. हा सामना नेहमी सर्वांच्या लक्षात राहिल अशा काही बाबी अशा
इशानचे सर्वात वेगवान द्विशतक
या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. ही संधी त्याने दोन्ही हातांनी पकडली आणि भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर एक संस्मरणीय पान जोडले. किशनने केवळ १२६ चेंडूत २०० धावा करत ख्रिस गेलचा विक्रम मोडला.
इशान चौथा भारतीय फलंदाज
एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. किशनच्या आधी रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी वनडे क्रिकेटमध्ये २०० धावा केल्या आहेत. रोहित शर्माने हा पराक्रम सर्वाधिक ३ वेळा केला आहे. जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर अशी कामगिरी करणारा तो नववा फलंदाज ठरला.
कोहलीने पाँटिंगला मागे टाकले
या सामन्यात विराट कोहलीने २०१९ नंतर वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. त्याने ९१ चेंडूत ११३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. कोहलीचे हे शतक एकदिवसीय क्रिकेटमधील ४४ वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७२ वे शतक होते आणि आता तो सर्वाधिक शतकांच्या बाबतीत रिकी पाँटिंगच्या पुढे गेला आहे. पाँटिंगच्या नावावर ७१ आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
बांगलादेशच्या भूमीवर
विराट कोहली आता बांगलादेशच्या भूमीवर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगाकाराला मागे टाकले. कोहलीच्या नावावर आता १०९७ धावा आहेत. संगकारा १०४५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियाची चौथी सर्वोच्च धावसंख्या
या सामन्यात टीम इंडियाने ८ गडी गमावून ४०९ धावा केल्या, ही त्यांची वनडे क्रिकेटमधील चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. टीम इंडियाचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ५ विकेट गमावून ४१८ आहे, जी त्याने २०११ मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती.
Double Tons by Indian batters in ODIs!! @sachin_rt ✅@Virendersehwag ✅@ImRo45 ✅
& now @ishankishan51 ! ????
An elite club to be a part of ?#TeamIndia pic.twitter.com/LqCrkWPv0b— BCCI (@BCCI) December 10, 2022
Indian Cricket Team Records In Third Match
Sports Bangladesh ODI