मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघापुढे आता यो-यो टेस्टनंतर डेक्सा टेस्टचे आव्हान उभे ठाकले आहे. ही टेस्ट त्यांना मैदानावरच खेळायची आहे, पण ती फिटनेससाठी असणार आहे. आगामी सर्व स्पर्धांसाठी डेक्सा टेस्टचा अवलंब करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अलीकडेच झालेल्या बैठकीत केला आहे.
कुठल्याही स्पर्धेसाठी निवड करताना किंवा राष्ट्रीय संघासाठी पात्र ठरविताना आता सर्व क्रिकेटपटूंना या दोन्ही चाचण्यांचा सामना करावा लागणार आहे. यो-यो टेस्ट काही वर्षांपूर्वीच लागू करण्यात आली होती. या टेस्टमध्ये खेळाडूंना साडेसात मिनिटांत दोन किलोमीटर अंतर पूर्ण करणे अनिवार्य आहे. मुख्य म्हणजे अनेक दिग्गज खेळाडू या टेस्टमध्ये नापास झालेले आहेत. सुरेश रैना, संजू सॅमसन, आणि अंबाती रायडूसारखे दमदार फलंदाज, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमीसारखे जबदरस्त गोलंदाज ही टेस्ट पास करू शकलेले नाहीत. कारण या टेस्टमध्ये फलंदाजांना १७ आणि गोलंदाजांना १९ गुण प्राप्त करणं अनिवार्य आहे. त्यामुळे आता आणखी एका नव्या टेस्टची भर पडल्याने क्रिकेटपटूंचे टेंशन वाढलेले आहे.
डेक्सा टेस्टची डोकेदुखी
यो-यो चाचणीसाठी खेळाडू तयारी करतात. साडेसात मिनिटांत दोन किलोमीटर धावण्याची मानसिकता तयार करतात. पण डेक्सा टेस्ट ही पूर्णपणे शरीराच्या अंतर्गत फिटनेसवर आधारित आहे. त्यासाठी नेमकी अशी कुठली तयारी करता येत नाही. पूर्णपणे फिट राहणे, हाच त्यावरचा उपाय आहे.
हे तपासले जाते
डेक्सा चाचणीत हाडांची घनता, शरीरातील चरबी, पातळ स्नायू, पाण्याचे प्रमाण आदी गोष्टी मोजल्या जातात. एका विशिष्ट्य मशीनद्वारे ही चाचणी केली जाते. याला बोन डेन्सिटी टेस्ट असे म्हणतात आणि ती लेझर बीमद्वारे केली जाते.
Indian Cricket Team BCCI New Test Policy Players
Sports Yo Yo Dexa