इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ दि जानेरो येथे त्यांचे मनापासून स्वागत केल्याबद्दल ब्राझीलमधील भारतीय समुदायाचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, हे पाहून आश्चर्य वाटते की ते भारतीय संस्कृतीशी किती घट्ट जोडलेले आहेत आणि भारताच्या प्रगतीबाबत किती उत्कटतेने कार्यरत आहेत.
मोदी यांनी स्वागताची काही क्षणचित्रेही सामायिक केली. पंतप्रधानांनी एका एक्स पोस्टमध्ये लिहिले: “ब्राझीलमधील भारतीय समुदायाने रिओ दि जनेरोमध्ये खूपच उत्साही स्वागत केले. भारतीय संस्कृतीशी त्यांची असलेली नाळ आणि भारताच्या प्रगतीबाबतची त्यांची तळमळ पाहून खूप आनंद झाला! स्वागताची काही दृष्ये येथे सादर करत आहे…”