इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हरियाणाची युवा बॉक्सर नीतू घनघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. तिने आज, शनिवारी (25 मार्च) 45-48 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. ती पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. नीतूने मंगोलियाच्या लुत्साईखानचा पराभव केला. न्यायाधीशांनी एकमताने नीतूच्या बाजूने निकाल दिला. भारतीय बॉक्सर नीतूने हा सामना 5-0 असा जिंकला.
सामना अतिशय रोमांचक होता आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत विजेत्याचा अंदाज लावणे कठीण होते. सामन्याचा निकाल जाहीर होण्याआधीच दोन्ही बॉक्सरपटू विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सज्ज झाले होते, मात्र अखेरीस भारतीय बॉक्सर विजयी झाली आणि मंगोलियन बॉक्सरपटूची निराशा झाली.
जगातील महान बॉक्सर मेरी कोमला पराभूत करून नीतू चमकली. मिनी क्युबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, नीतूच्या पंचांनी भारतीय बॉक्सर एमसी मेरी कोमला थक्क केले. कॉमनवेल्थ गेम्समधील 48 किलो वजनी गटाच्या चाचण्यांदरम्यान मेरी कोमला रिंग सामन्यात गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला माघार घ्यावी लागली. सहा वेळा विश्वविजेत्या मेरी कोमला उपांत्य फेरीच्या पहिल्या फेरीत नीतूकडून पराभव पत्करावा लागला.
नीतूने 2017 मध्ये युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ही स्पर्धा गुवाहाटी येथे खेळवली गेली. यानंतर 2018 मध्ये तिने युथ एशियन चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. तिने 2018 मध्ये यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा चमत्कार केले आणि चॅम्पियन बनली. याशिवाय तिने 2022 मध्ये सोफिया बल्गेरिया येथे झालेल्या स्ट्रेडजा कपमध्ये सुवर्ण आणि 2023 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
???? ? ??? ????? ??
NITU GHANGHAS beat Lutsaikhan Atlantsetseg of Mongolia by 5⃣-0⃣in the FINAL ?#WorldChampionships #WWCHDelhi #Boxing #WBC2023 #WBC @NituGhanghas333 pic.twitter.com/5kpl6dUFzU
— Doordarshan Sports (@ddsportschannel) March 25, 2023
Indian Boxer Neetu Ghanghas Golden Punch World Championship