इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जानेवारी महिना आता संपत आला आहे. लवकरच फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. हा फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त महाशिवरात्रीसह अनेक प्रसंगी बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत या सुट्ट्यांची माहिती आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी पाहिल्यास, फेब्रुवारी 2023 मध्ये, विविध राज्यांमध्ये बँका 10 दिवस बंद राहतील. अशा परिस्थितीत या बँकांच्या सुट्ट्यांमध्ये लोकांना ऑनलाइन सेवांद्वारे आपले काम चालवावे लागणार आहे.
फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी बँक शाखांना सुट्ट्या असतील ते जाणून घेऊया.
तारीख…दिवस….सुट्टी कुठे असेल
05 फेब्रुवारी…….. रविवार…….. देशभरात
11 फेब्रुवारी…….. दुसरा शनिवार……..देशभरात
12 फेब्रुवारी ……..रविवार ……..देशभरात
15 फेब्रुवारी …….. बुधवार…….. लुई नागाई नी हैदराबाद, तेलंगणा
18 फेब्रुवारी……..शनिवार …….. महाशिवरात्री बेंगळुरू, हैदराबाद, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, तिरुवनंतपुरम, अहमदाबाद, बेलापूर
19 फेब्रुवारी…….. रविवार…….. देशभरात
20 फेब्रुवारी……..सोमवार…….. राज्य दिन आयझॉल, मिझोरम
21 फेब्रुवारी……..मंगळवार…….. लोसार गंगटोक, सिक्कीम
25 फेब्रुवारी…….. चौथा शनिवार…….. देशभरात
26 फेब्रुवारी…….. रविवार…….. देशभरात
मात्र, वरील दिवशी बँक शाखांना सुटी असूनही, तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार किंवा इतर कामे करू शकता. सुट्टीच्या दिवशीही बँकेची ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहे.
Indian Bank Holidays RBI February 2023 List